आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM मोदींनी राष्ट्रपती मुखर्जींना म्हटले अमुल्य रत्न, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रपती प्रणव मुखर्जींचा आजा 79 वा वाढदिवस आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी ट्विट करुन राष्ट्रपतींना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती मुखर्जींना देशातील 'अमुल्य रत्न' संबोधले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी देखिल मुखर्जींना शुभेच्छा दिल्या.

मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले, 'राष्ट्रपतींनी प्रदिर्घ काळ राजकारणाच्या माध्यमातून देशासेवा केली आहे. त्यांच्या ज्ञानाला प्रत्येकजण सलाम करतो. प्रणवदांच्या मित्रांसोबत त्यांचे राजकीय विरोधक देखिल त्यांचा सन्मान करतात. मी त्यांच्या दिर्घ आयुष्याबद्दल आणि चांगल्या प्रकृतीची कामना करतो.'

पश्चिम बंगालमध्ये झाला जन्म
प्रणव मुखर्जींचा जन्म 11 डिसेंबर 1935 मध्ये तत्कालिन बंगाल प्रांतातील बीरभूम जिल्ह्यातील मिराती येथे एका बंगाली ब्राम्हण कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभागी होते. ते 1952 ते 1964 पर्यंत पश्चिम बंगालच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य होते.
बातम्या आणखी आहेत...