आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमित शहा म्हणाले, राम मंदिरासारख्या मुद्द्यासाठी 370 जागा आवश्‍यक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने मंगळवारी (ता.26) वर्षपूर्ती केली. यानिमित्त भाजपचे अध्‍यक्ष अमित शहांनी पत्रकार परिषद घेतली. सरकारने एका वर्षात केलेल्या चांगल्या काम‍गिरीचे शहांनी यावेळी कौतुक केले. वर्षभरात एकही भ्रष्‍टाचाराचे प्रकरण घडलेले नाही. मात्र, राम मंदिरासारखा महत्त्वाचा मुद्दा सोडवण्‍यास राज्यसभेतही आधी बहुमत मिळवावे लागेल. त्यासाठी 370 जागा आवश्यक आहेत, असा 'युटर्न' शहांनी घेतला.

अमित शहा यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे
>पाकिस्तानबरोबर संबंध कसे राहतील हे त्याच देशावर अवलंबून आहे.
>माझ्यासाठी प्रत्येक निवडणूक ही 'परीक्षा'. फक्त बिहार निवडणूक का? मला विश्‍वास आहे, की बिहारमध्‍ये भाजपला बहुमत मिळेल.
>दिल्ली सरकार आणि केंद्रात सुरु असलेला वाद घटनात्मक आहे. तो न्यायालयात गेल्यानंतर सोडवला जाईल.
>ब्लॅकमनी खातेधारकांची नावे घोषित करा, असे म्हणणारेच संबंधित व्यवस्थेचे समर्थक आहेत.
>केवळ 20 कोळसा, खाणी वाटप करुन 2 लाख कोटी पेक्षा जास्त रक्कम देशाच्या तिजोरीत जमा केले आहेत.

वर्षभरात सरकारवर एकही भ्रष्‍टाचाराचा आरोप नाही
त‍त्कालीन युपीए सरकारच्या कार्यकाळा देशात घोटाळ्यांची मालिका सुरु झाली होती. युपीए सरकारवरच भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. परंतु एनडीए सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु वर्षभरात सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही.

>तत्कालीन युपीए सरकारवर देशातील जनतेचा विश्‍वास नव्हता. देशाच्या पंतप्रधानांप्रती मंत्रिमंडळात अविश्‍वास होता.
>स्वातंत्र्यानंतर प्रथमच देशातील नागरिकांनी एक कॉंग्रेसत्तर बहुमत सरकार बनवण्‍याची संधी दिली आहे.
मोदींचा देशाला उद्देशून पत्र
पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांना उद्देशून पत्र लिहिले आहे. हे पत्र मंगळवारी सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्‍ये ते जा‍हिरात स्वरुपात छापून आले आहे. त्यात मोदींनी एका वर्षातील कामगिरीचे कौतुक केले आहे. देशाने गमावलेला विश्‍वास पुन्हा कमावला आहे. वर्षपूर्तीनिमित्त मोदींनी आपले संकेतस्थळ नव्याने बांधणी केली आहे. या व्यतिर‍िक्त आपल्या चाहत्यांना संदेशही पाठवलाय. दुसरीकडे 'ट्‍विटर'वर मंगळवारी सकाळपासूनच #SaalEkShuruaatAnek टॉप ट्रेंडमध्ये दिसत आहे.