आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Wrote About Intolerance In His Article In The Economist

#intolerance वर पुन्हा बोलले मोदी, म्हणाले एकिने राहणे ही आमची ओळख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : नरेंद्र मोदी - Divya Marathi
फाइल फोटो : नरेंद्र मोदी
नवी दिल्ली - भारतात सुरू असलेल्या असहिष्णुतेच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिळून मिसळून राहणे ही आमची ओळख असल्याचे वक्तव्य केले आहे. अमेरिकन मॅग्झिन द इकॉनॉमिस्टमध्ये मोदींनी या विषयावर एक लेख लिहिला आहे. विविधता हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. दीर्घकाळापासून भारतात याची परंपरा आहे. आपल्या सामाजिक शक्तीमध्ये ती दिसून येते. मोदींच्या लेखातील काही भाग मॅगझिनच्या पॅरिसच्या रिपोर्टरने ट्वीट केले आहे. गेल्या दहा दिवसांत दुसऱ्यांदा पंतप्रधानांना असहिष्णुतेच्या मुद्यावर खुलेपणाने प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी त्यांनी ब्रिटनमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत वक्तव्य केले होते.

स्वतःच्या सराकरबाबत मोदींचे मत...
मोदींनी लेखामध्ये त्यांच्या सरकारच्या कामकाजाबाबतही मत मांडले आहे... मोदींनी लिहिले की, आमच्या सरकारने हमारी सरकारने 18 महिन्यांमध्ये अनेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांना आमच्याकडून खूप अपेक्षा अाहेत. पण आर्थिक विकास करताना देशाच्या पर्यावरणाला धोका पोहोचू नये या प्रयत्नात असल्याचे मोदी म्हणाले.

जगातील इतर बड्या हस्तींचेही लेख
द इकोनॉमिस्ट मॅगझिनच्या 30 व्या स्पेशल एडिशनच्या निमित्ताने मोदींसह जगातील अनेक मोठ्या हस्तींनीही यात लेख लिहिले आहेत. मॅगझिनच्या या कव्हर पेजचे नाव, द वर्ल्ड इन 2016 असे आहे. मोदींशिवाय IMM प्रमुख क्रिस्टीन लेगार्ड, नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजई यांनीही लेख लिहिले आहेत.
असहिष्णुतेवर काय म्हणाले होते राष्ट्रपती
देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिक, चित्रपट कलावंत आणि शास्त्रज्ञांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. पुरस्कार परत करू नका. मतभेद असतील तर चर्चा अथवा संवादातून व्यक्त व्हा, असे राष्ट्रपती म्हणाले. राष्ट्रपती म्हणाले की, तर्कापेक्षा भावना कधीही वरचढ होऊ देऊ नये. काही मुद्द्यांवर तीव्र मतभेद किंवा असहमती असेल तर चर्चा अथवा वादविवादातून व्यक्त व्हा. राष्ट्रीय पुरस्कार हे तुमच्यातील कलागुण, प्रतिभा व योग्यतेला दिलेली पावती असते. तुमच्यातील बुद्धिमत्ता कला आणि गुणवत्तेला मिळालेली ती लोकमान्यता असते. त्यामुळे अशा पुरस्कारांचे महत्त्व ओळखून त्यांचा आदर करायला हवा. ते सरकारला परत करू नयेत.