आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PM Modi\'s Live Speech To Students, Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींचे लाइव्ह भाषण: शिक्षकांची विद्यार्थ्यांवर सक्ती, लघुशंकेलाही जाऊ दिले नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- शिक्षकदिनानिमित्त (5 सप्टेंबर) देशभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाइव्ह भाषण ऐकवण्यात आले. यादरम्यान बहुतेक शाळांमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर सक्ती करण्यात आल्याचे चित्र दिसले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सायंकाळी उशीरापर्यंत थांबवण्यात आले. एवढेच नव्हे तर चिमुरड्यांना लघुशंकेलाही सोडण्यात आले नाही.

बंगळुरुतील एका शाळेत नरेंद्र मोदींचे लाइव्ह भाषण सुरु असताना एका विद्यार्थ्याने लघुशंकेला जाण्यास आपल्या शिक्षिकेला विचारले. परंतु त्याला संबंधित शिक्षिकेने जाऊ दिले नाही. मोदींचे भाषण संपेपर्यंत विद्यार्थ्याला वर्गातच बसवून ठेवण्यात आले. देशातील अनेक शहरातील शाळांमधील चित्रही या पेक्षा वेगळे नव्हते.

अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना तासंतास बसवून ठेवण्यात आले. मोदींच्या भाषणादरम्यान काही विद्यार्थी डुलक्या घेत असताना दिसले. काही ठिकाणी वीज गुल झाली होती तर काही ठिकाणी ऐनवेळी पावसामुळे गोंधळ उडाला. तसेच काही शाळांमध्ये चॅनल बदलताना नरेंद्र मोदी यांच्या लाइव्ह भाषणाऐजजी भारतविरूद्ध इंग्लंड या एकदिवसीय क्रिकेट लढत दिसल्याने हाश्शा पिकला. धक्कादायक म्हणजे काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्याच्या आदरतिथ्याच्या कामात जुंपूंन ठेवल्याचे पालकांनी सांगितले.

पंजाबमधील लुधियानात मुसळधार पावसामुळे एका शाळेत खूप गोंधळ उडाला. पावसामुळे टीव्ही आणि विद्यार्थ्यांना सांभळताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली.

दिल्‍लीसह अन्य शहरात सायंकाळी उशीरापर्यंत विद्यार्थ्यांना थांबवून ठेवण्यात आले. यामुळे पालकांचीही मोठी धावपळ उडाली. दिल्‍लीत शुक्रवारी सायंकाळी अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना सोडल्याने अनेक भागात वाहतूक ठप्प झाली होती.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, नरेंद्र मोदींचे भाषण संपल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जुंपले टेबल खुर्च्या उचलण्याच्या कामात...

(फोटोः बंगळुरुमधील एका शाळेत पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरु असताना एका विद्यार्थ्याने लघुशंकेला जाण्यास परवानगी मागितली. मात्र, शिक्षिकेने त्याला परवानगी दिली नाही. भाषण संपल्यानंतरच त्याला सोडण्यात आले.)