नवी दिल्ली - पंतप्रधान
नरेंद्र मोदींनी रविवारी पुन्हा एकदा रेडिओच्या माध्यमातून जनतेशी थेट संपर्क साधला. 'मन की बात' द्वारे यावेळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंमली पदार्थ म्हणजे ड्रग्जचे धोके मांडल विचार जनतेसमोर ठेवले. ते म्हणाले, ''जेव्हा
आपण एखाद्या तरुणाला नशा करताना पाहतो, त्यावेळी त्याच्याबाबत वाईट बोलतो. पण सत्य हे आहे की, वाईट तो तरुण नाही तर वाईट व्यसन असते.
मोदी म्हणाले की, विवेकानंद म्हणाले आहेत की, ‘एक विचार घेऊन तो विचार पूर्णपणे आपल्या जीवनात उतरवा. त्याबाबत विचार करा. त्याचीच स्वप्ने पाहा आणि जी जीवनात उतरवा. ड्रग्जपासून दूर राहायचे असेल कर आपल्या मुलांना ध्येयवादी बनवा, त्यांना स्वप्ने पाहायला शिकवा. ते म्हणाले, ज्याच्या जीवनात कोणतेही लक्ष्य नसते त्याच्या जीवनात ड्रग्जचा प्रवेश होतो. ड्रग्जचे व्यसन करणा-या तरुणांना मी विचारू इच्छितो की, ज्या पैशांनी ते ड्रग्ज खरेदी करतात तो सर्व पैसा कुठे जातो. तो पैशा दहशतवादासाठी वापरला जातो असे मोदी या कार्यक्रमात म्हणाले. मोदी म्हणाले ड्रग्ज म्हणजे वाईटाचे थ्री D आहे - Darkness, Destruction and Devastation.
मोदींच्या 'मन की बात'
- मी कोणताही उपदेश देत नसून हे देशाचे दुःख आहे. त्यामुळे मी दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न करत आहे. ड्रग्जच्या समस्येवर जबाबदारीचे वातावरण तयार करण्याचा हा प्रयत्न आहे.
- यूएनने 21 जूनला जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यास होकार दिला ही आमच्यासाठी अत्यंत गौरवाची आनंदाची बाब आहे.
- भारताच्या योग प्रस्तावाला 177 देशांचे समर्थन मिळणे हाही एक विश्वविक्रम आहे.
- जम्मू-कश्मीरच्या क्रिकेट टीमने अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत मुंबईचा पराभव करून मिळवलेला विजय हा अभूतपूर्व आहे.
- विश्वविजेच्या ब्लाइंड क्रिकेट टीमची मी भेट घेतली. त्यांची ऊर्जा पाहून मला मोठा आनंद मिळाला आणि त्याहीपेक्षा अधिक उर्जा मिळाली.
- मुख्यमंत्र्यांच्या बैठकीदरम्यान आम्ही एका रिट्रीट कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. त्यात आम्ही समाजाशी संबंधित मुद्यांवर अत्यंत मोकळेपणाने चर्चा केली आहे.
- सर्न नागरिकांनी एकत्र येऊन 'ड्रग्स से मुक्त भारत' या हॅशटॅगसह एक मोहीम हाती घ्यावी असे माझे देशवासीयांना आव्हान आहे.
- आपल्या सहका-यांना व्यसनांना NO म्हणण्यासाठी तुम्ही शक्ती द्या. त्याचप्रमाणे ते जे करत आहेत ते चुकीचे असल्याचे सांगण्याचे धैर्यही तुम्ही बाळगायला हवे.
- व्यसन हे स्टाइल स्टेटमेंट नाही आणि 'कूल' देखिल नाही. खरं म्हणजे हा शेवटाकडे जाण्याचा मार्ग आहे.
- ही एक साइको-सोशो-मेडिकल समस्या आहे. समाज, सरकार, न्यायसंस्था सर्वांनी या दिशेने एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे, दोन नोव्हेंबर रोजी झालेल्या मन की बात कार्यक्रमात मोदींनी लिहिले होते की, काही लोकांनी त्यांना व्यसनांच्या बाबतील लिहिले आहे. त्यावेळी या बाबत लोकांना आपले विचार मांडण्याचे आव्हान मोदींनी केले होते. मन की बात कार्यक्रमाद्वारे दर महिन्याला मोदी देशवासीयांसमोर आपले विचार मांडतात.