आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘शाळा जाळण्यात आल्या पण मुलांचा ध्यास कायम’, ‘मन की बात’ मधून काश्मीर समस्येवर प्रकाश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दहशतवाद्यांनी काश्मीरमधील अनेक शाळा जाळल्या, परंतु अलीकडेच झालेल्या बोर्डाच्या परीक्षेला स्थानिक विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. त्यावरून मुलांमध्ये प्रगतीचा ध्यास अजूनही कायम आहे. मुलांना अभ्यासातूनच उत्तम भविष्य घडेल यावर विश्वास आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

‘मन की बात’मध्ये मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दहशतीच्या वातावरणातही स्थानिक विद्यार्थ्यांची परीक्षेतील उपस्थिती ९५ टक्क्याहून अधिक होती. पालक, शिक्षक व गाव प्रमुखांना त्याचे श्रेय जाते. अनेक गावातील शाळांना दहशतवाद्यांनी पेटवून दिले. त्यामुळे काही दिवसांपासून शैक्षणिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण पाहायला मिळाले. परंतु मी त्यांना आपल्या क्षेत्रात जाऊन विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये याची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. परीक्षेला विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती पाहता माझा शब्द पाळण्यात आला याचे समाधान वाटते, असे मोदी यांनी मन की बातमध्ये नमूद केले.

तत्पूर्वी काश्मीर खोऱ्यातील ४० ते ५० गावप्रमुखांसोबत मी बैठक घेतली होती. प्रदेशातील समस्येवर त्यांच्याशी मनमोकळी चर्चा केली. कायदा व सुव्यवस्था, विकासाचे मुद्दे यासह अनेक समस्यांवर चर्चा केली होती, अशी माहिती मोदींनी या वेळी दिली.

सैनिकांसोबतची आठवण
यंदाची दिवाळी माझ्यासाठी विशेष होती. आयटीबीपीच्या जवानांसोबत मला यंदाची दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली. सीमेवरील प्रत्येक सैनिकासोबत संपूर्ण देशातील नागरिक आहेत, असा संदेश मला यानिमित्ताने त्यांच्यापर्यंत पोहोचवता आला. लोकांनीही जवानांच्या नावाने पत्रे पाठवली. कार्टून, चित्र, व्हिडिआे पाठवून आपल्या भावना सैन्यास कळवल्या, असे मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये सांगितले.
बातम्या आणखी आहेत...