आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM मोदींच्या पुतणीचे निधन, किरायाच्या घरात शिलाई-ट्यूशनवर चालत होता उदरनिर्वाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जी-20 वरुन पतल्यानतंर मोदींनी प्रथम भाऊ प्रल्हाद यांना फोन करुन विचारपूस केली. - Divya Marathi
जी-20 वरुन पतल्यानतंर मोदींनी प्रथम भाऊ प्रल्हाद यांना फोन करुन विचारपूस केली.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुतणीची ह्रदयाच्या दीर्घ आजारानंतर निधन झाले आहे. मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांची मुलगी निकूंजबेन (41) यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची आर्थिकस्थिती नाजूक होती. शिलाई मशिन आणि मुलांचे ट्यूशन घेऊन त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. अहमदाबादमधील यूएन मेहतो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.
8-9 महिन्यांपासून होत्या आजारी
मीडिया रिपोर्टनुसार, पीएम मोदी जी-20 परिषदेवरुन परतल्यानंतर त्यांना पुतणी आजारी असून हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याची माहिती मिळाली. पंतप्रधानांनी भारतात परतल्याबरोबर पुतणीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भाऊ प्रल्हाद यांना फोन केला.
- निकूंज यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळाल्यानंतर ते सतत संपर्कात होते.
- पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद यांनी सांगितले, 'नरेंद्र मोदींनी चीनवरुन परतल्याबरोबर निकूंजची विचारपूस केली. अंत्यसंस्कारानंतरही त्यांनी फोन करुन आवश्यक ते विधी करुन घेण्यास सांगितले.'
किरायाच्या घरात राहात होत्या निकूंजबेन, शिलाई मशीनवर होता उदरनिर्वाह
- निकूंजबेन मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे किरायाच्या घरात राहात होत्या.
- निकूंज यांच्या कुटुंबात पती आणि दोन लहान मुले आहेत.
- मीडिया रिपोर्टनुसार, त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखिची होती. त्यांचे पती एका खासगी संस्थेत कॉम्प्यूटर रिपेअरिंगचे काम करतात.
- निकूंजबेन या शिलाई मशिनवर कपडे शिवण्याचे काम करुन मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवत होत्या.
बातम्या आणखी आहेत...