आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PM Naredra Modis Foreign Trips Cost Rs 37 Crore In First Year

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नरेंद्र मोदींच्या परराष्‍ट्र दौर्‍यावर 37 कोटींचा खर्च, फक्त टॅक्‍सीचे बिल 2.4 कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी 26 मे, 2014 ला शपथ घेतली. पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी भूतानचा पहिला परराष्‍ट्र दौरा केला होता. 26 मे ते 16 एप्रिल, 2015 पर्यंत मोदींनी एकूण 16 देशांचा दौरा केला होता. मोदींनी 14 ते 19 मे 2015 या काळात चीन, मंगोलिया आणि साउथ कोरियाचा दौरा केला तर मागील महिन्यात मोदींनी यूएई दौर्‍यावरून मायदेशात परतले. पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत 20 देशांचा दौरा केला आहे.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून 2014 ते 2015 या काळात एकूण 20 देशांचा दौरा केला. यापैकी मोदींच्या 16 देशांच्या भारतीय दुतावासांनी 37.22 कोटी रुपयांचा खर्च करण्‍यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात ऑस्ट्रेलियाचा दौरा सगळ्यात महागडा ठरला. ऑस्ट्रेलियात मोदींसाठी मागवण्यात आलेले टॅक्सीवर सुमारे 2.5 कोटी रुपये खर्च करण्‍यात आले.

माहितीचा अधिकाराच्या हवाल्याने ही माहिती मीडियाला देण्यात आली आहे. यात चार देशांच्या दौर्‍याचा समावेश नाही. लोकेश बत्रा (रिटायर्ड कमांडेंट ) यांनी मोदींच्या 20 देशाच्या दूतावासकडून माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करून ही माहिती मिळवली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये जवळपास नऊ कोटी खर्च
नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारतीय दूतावासने नऊ कोटी रुपये खर्च केले होते. मोदींच्या राहाण्यावर 5.60 कोटी केले. विशेष म्हणजे फक्त टॅक्सीचे बिल 2.40 कोटी रुपये मोजले.

भूतानचा सगळ्यात स्वस्त दौरा
मोदींच्या अमेरिका, जर्मनी, फिजी आणि चीन दौर्‍यावरही खूप खर्च झाला. परंतु मोदींचा भूतान दौरा सगळ्यात सगळ्यात स्वस्त ठरला. या दौर्‍यावर 41.33 लाख रुपये खर्च झाला.

अमेरिकन दौर्‍यावर सहा कोटी खर्च
पंतप्रधानांनी सप्टेंबर 2014 मध्ये न्यूयॉर्कचा दौरा केला. यादरम्यान मोदींच्या सुरक्षेवर 9.16 लाख खर्च करण्‍यात आला. परराष्ट्र मंत्रालय आणि पीएमओच्या अधिकार्‍यासाठी 11.51 लाख रुपये खर्चून हॉटेल्‍सचे रुम्स बुक करण्यात आले होते. न्यूयॉर्कमध्ये मोदी पॅलेस हॉटेलमध्ये थांबले होते. या हॉटेलचे बिल 6.13 कोटी रुपये होते.

चीनमधील एका हॉटेलचे बिल एक कोटी
पंतप्रधान मोदींसाठी चीनमध्ये 1.06 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. हे एका हॉटेलचे बिल होते. तर 60.88 लाख रुपयांच्या कॅब बुक करण्‍यात आल्या होत्या. एअरक्राफ्टवर 5.90 लाख रुपये खर्च करण्‍यात आले होते.

या दौर्‍याच्या खर्चाची माहिती मिळाली नाही..
मोदींच्या जपान, श्रीलंका, फ्रान्स, साउथ कोरियाच्या दौर्‍यांवर झालेल्या खर्चाचा तपशील देण्यास संबंधित दूतावासांनी नकार दिला आहे.