आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींवर नाव न घेता टीका, \'गरीबी पाहाण्यासाठी कॅमेरामॅन सोबत नेत नाही\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
46 व्या इंडियन लेबर कॉन्फरन्समध्ये बोलताना पंतप्रधान मोदी. - Divya Marathi
46 व्या इंडियन लेबर कॉन्फरन्समध्ये बोलताना पंतप्रधान मोदी.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी 46 व्या इंडियन लेबर कॉन्फरन्स मध्ये गरीबी पाहाण्यासाठी मी कॅमेरामॅनसोबत घेऊन जात नाही, असे म्हणत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 'मी गरीब कुटुंबातून आलो आहे. गरीब आणि मजुरांचा माझ्यावर सर्वाधिक हक्क आहे.'
मजुरांना प्रमाणपत्र देणार सरकार
पंतप्रधान मोदी म्हणाले, मजुरांच्या कौशल्याचे मोल ओळखून सरकार त्यांच्यासाठी नवी योजना तयार करत आहे. मजुरांना त्यांच्या कौशल्याचे सरकार प्रमाणपत्र देणार आहे. यामुळे त्यांना रोजगार मिळण्यास मदत मिळेल. त्यासोबतच मोदींनी सांगितले, की तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी सरकारने कौशल्य विकासाची योजना तयार केली आहे. लवकरच चीन, जपान आणि जर्मनी प्रमाणे अॅप्रेंटिस योजना सुरु केली जाईल.
कामगार कायद्याला कामागाराभिमूक करणार
मोदी म्हणाले, देशातील कामगार कायदा कामागाराभिमूक करण्याची गरज आहे. उद्योगपतींनी देखील मजुरांबद्दलचे आपले विचार बदलण्याची गरज आहे. एक समान्य कामगार देखील देशाच्या नवनिर्माणामध्ये आपला वाटा उचलत असतो. आपण कामगारांच्या श्रमाचे मोल ओळखून त्याचा सन्मान केला पाहिजे. गरीब आणि शेतकऱ्यांचे कल्याण करणे हाच सरकारचा मुख्य उद्देश आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, राहुल गांधींचा 'तो' फोटो