आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Address To ASEAN Business Summit

अाशियान बिझनेस संमेलनात मोदींनी व्यक्त केला पारदर्शी करव्यवस्थेचा विश्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणुकीसाठी आमंत्रण देतानाच देशात पारदर्शी कर व्यवस्था देण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्याच बरोबर बौद्धिक संपदा अधिकाराची रक्षा करण्याचे वचनही दिले आहे. क्वालालंपूरमध्ये आयोजित आशियान बिझनेस तथा गुंतवणूक शिखर संमेलनात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सरकारच्या वतीने देशाच्या विकासाच्या आड येत असलेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी सरकारच्या वतीने दीड वर्षात करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी गुंतवणूकदारांना दिली. महागाई आणि व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. कर संग्रह, जीडीपी विकास दर आणि विदेशी गुंतवणूक वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. राजकोशीय घाटा कमी झाला आहे. रुपयादेखील स्थिर स्थितीत आहे. औद्योगिक उत्पादन सूचकांक (आयआयपी)मध्ये देखील महत्त्वपूर्ण सुधारणा झाली आहे.

आर्थिक सुधारणांमध्ये शेवटचा टप्पा नाही, तर शेवटचा टप्पाच भारताला बदलायचा असल्याचे मोदी यांनी सांगितले. भारत हा सुधारणांच्या मध्ये येणारे एक स्थानक असून आम्हाला भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवायचे अाहे. भारत सर्व नव्या संशोधनांचा आणि बौद्धिक संपदेच्या अधिकारांची रक्षा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. बौद्धिक संपदा प्रशासनला अधिक पारदर्शी बनवण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या असल्याचेही ते म्हणाले. या वर्षीच्या शेवटपर्यंत व्यापक आयपीआर धोरणाचा अवलंब करण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

योजनांची माहिती
सरकारच्या वतीने ६५ वर्षांची परंपरा तोडून विदेशी धोरण निश्चित करताना राज्याचा समावेश करण्यात आला असल्याचे मोदी यांनी सांगितले. जनधन योजनेत १९ कोटी नवीन खातेधारक जोडले गेले आहेत. "सर्वांसाठी घर' कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली असून या अंतर्गंत शहरांमध्ये दोन कोटी घरे तसेच ग्रामीण भागात दोन कोटी ९५ लाख घरे बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी देशात जीएसटी लागू होण्याचा विश्वासदेखील मोदी यांनी व्यक्त केला.
पुढील स्लाइड्सवर वाचा काय म्हणाले PM मोदी...