आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi And BJP President Amit Shah Duo Lost First Time News In Marathi

नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा \'विजयरथ\' 13 वर्षांत दिल्लीत पहिल्यांदा थांबला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीनंतर देशात झालेली प्रत्येक निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा या जोडीने जिंकली आहे. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड धक्का बसला आहे. गेल्या 13 वर्षांत या जोडीचा हा पहिला पराभव आहे.

अमित शहा यांनी वयाच्या 19 व्या वर्षातच निवडणुकीचे व्यवस्थापन सुरु केले होते. शहा यांनी सहकारी संस्थांपासून महाविद्यालय आणि नगर परिषद, पंचायत समित्यांपासून विधानसभा-लोकसभेपर्यंत तीन डझनाहून अधिक निवडणुकांचे व्यवस्थापन केले आहे. प्रत्येक निवडणुकीत विजयश्री खेचून आली होते. मात्र, दिल्लीत 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोदी-शहा यांचा विजयरथ थांबवला आहे. त्यामुळे मोदींच्या विरोधकांचे चेहरे खुलले आहेत. दिल्ली निवडणुकीत सपा, राजद, जदयू, तृणमूल, माकपसारख्या भाजप काँग्रेसविरोधी पक्षांनी ‘आप’ला पाठिंबा दिला होता. नितीशकुमार आणि ममता बॅनर्जी जाम खुश आहेत. 'आप'च्या एकतर्फी विजयाचा सर्वात पहिला परिणाम बिहारमध्ये दिसू लागला आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपने जितनराम मांझी यांना हाताशी घेवून जद (संयुक्त) मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र भाजप मांझींपासून चार हात लांब आहे. जे भाजप नेते मांझींना पाठिंबा दर्शवून सरकार स्थापनेचा दावा करत होते तेच मांझींची बंडखोरी जद(यू)चा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत आहेत.

पुढील वर्षी प. बंगाल, केरळ, आसाम तामिळनाडूमध्ये होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कोणती रणनिती आखते, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्येे 2017 मध्ये निवडणूक होणार आहे. पंजाबमध्ये 'आप'चे चार खासदार आहेत.

सर्व स्टार हारले-
कॉंग्रेस-
किरण वालिया, शर्मिष्ठा मुखर्जी, मतीन सिंह चौधरी, प्रल्हाद सिंह आणि हारुन यूसुफ

भाजप- कृष्णा तीरथ, नुपुर शर्मा, जगदीश मुखी, रणबीर सिंह बिदूरी

भाजपमधून 'आप'मध्ये आलेले सर्व विजयी
रामनिवास गोयल, रघुवेंद्र शौकीन, वेदप्रकाश, करतार सिंह तंवर, नरेश बाल्यान, फतेह सिंह, सौरभ भारद्वाज

'आप'मधीन भाजपमध्ये गेलेल्यांचा पराभव
विनोद कुमार बिन्नी, एमएस धीर, अशोक चौहान, शकील अंजुम चौधरी

'आप'च्या या तिघांना करावा लागला पराभवाचा सामना
मोहम्मद यूनुस, सीएल गुप्ता आणि डॉ.अतुल गुप्ता

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, काय म्हणतोय 'वर्ल्ड मीडिया'