आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi And Chinese President, Mr. Xi Jinping, At Delegation Level Talks

शिखर बैठक : मुंबईचा शांघायच्या धर्तीवर विकास, कैलास मानसरोवरसाठी नवा मार्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील शिखर बैठक संपली असून मुंबई शहराचा विकास शांघायच्या धर्तीवर करण्याबद्दल एकमत झाले आहे. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी मुंबईचे शांघाय करण्याचे स्वप्न मुंबईकरांना दाखविले होते, हे विशेष.
शिखर बैठकीतील चर्चेत दोन्ही देशांदरम्यान, धार्मिक यात्रा, आरोग्य, संस्कृती, आर्थिक आणि व्यापारासंबंधीचे 12 करार झाले. कैलास मानसरोवरसाठी जाणार्‍या यात्रेकरुंना आता नवा पर्यायी मार्ग मिळणार आहे. तिबेट मार्गे यात्रेकरुंना मानसरोवरला जाता येणार आहे. त्यासाठीच्या करारासाठी शिखर बैठकीत सहमती झाली आहे. सध्या यात्रेकरु उत्तराखंडच्या रस्ते मार्गाने जातात. यासोबतच ऑडिओ व्हिज्युअल को प्रोडक्शनसंबंधीही करार झाला आहे. मुंबईचा विकास चीनच्या शांघाय शहराच्या धर्तीवर करण्यासंबंधीही दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिखर बैठकीनंतर म्हटले आहे, 'चीन आणि भारत यांच्यात जुने संबंध आहेत. चांगल्या संबंधासाठी सीमेवर शांतता गरजेची आहे. चीनसोबतचे आपले व्यापारी संबंध हे क्षमतेपेक्षा फार कमी आहेत. आजच्या बैठकीत चीनला, भारतीय कंपन्यांना तेथील बाजारपेठेत संधी दिली जावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावर जिनपिंग यांनी याबाबत विचार करु असे म्हटले आहे. दोन्ही देशांमध्ये शिखर बैठकांचे सत्र सुरु राहावे अशी आमची इच्छा असल्याचे जिनपिंग म्हणाले.' पंतप्रधान मोदी म्हणाले, की भारतात मुलभूत सेवा-सुविधा आणि उद्योगांसाठी चीनने गुंतवणूक करण्यासाठी आम्ही त्यांना निमंत्रण दिले आहे. 20 बिलिअन डॉलरची गुंतवणूक करण्याचे चीनने मान्य केले आहे. रेल्वेमध्ये गुंतवणूक करण्यास चीन तयार झाला आहे.