आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीम मोदींच्या विदेश दौऱ्यावर 567 कोटी रुपये खर्च, अंदाजा पेक्षा दुप्पट वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदींनी या वर्षात आतापर्यंत एकही विदेश दौरा केला नाही. या महिन्याच्या शेवटी ते अमेरिकेला जाणार आहेत - Divya Marathi
मोदींनी या वर्षात आतापर्यंत एकही विदेश दौरा केला नाही. या महिन्याच्या शेवटी ते अमेरिकेला जाणार आहेत
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांनी विदेश वाऱ्यांवर 2015-16 मध्ये 567 कोटी रुपये खर्च केले आहेत. हा खुलासा अर्थसंकल्प अहवालातून झाला आहे. मोदी पुढील आर्थिक वर्षात विदेश दौऱ्यावर 54% काम करु इच्छित आहेत.

अंदाजापेक्षा किती जास्त खर्च झाला
- 2015-16 च्या सुरुवातीला विदेश दौऱ्यांवरील खर्चाचा अंदाज 269 कोटी रुपये होता. मात्र प्रत्यक्षात दुप्पट खर्च झाला आहे.
- यूपीए-2 च्या 5 वर्षांच्या काळात (2009-10 ते 2013-14) मनमोहनसिंग आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या विदेश दौऱ्यांवर 1500 कोटी रुपये खर्च झाले होते.
- एनडीए सरकारच्या तीन वर्षांचा कार्यकाळाचा विदेश दौऱ्यांचा खर्च यात जोडला तर (2014-15 ते 2016-17) हा आकडा जवळपास 1140 कोटी रुपयांपर्यंत जातो.
- या प्रवास खर्चात मोदी, त्यांचे मंत्री, माजी पंतप्रधान, इतर व्हीव्हीआयपी, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या दौऱ्यांचा समावेश असतो.
- मोदी सरकारमध्ये 64 मंत्री आहेत. यूपीएमध्ये 75 मंत्री होते.
- 2013-14 च्या तुलनेत मोदींच्या मंत्र्यांना 25 टक्के जास्त वेतन मिळत आहे.
- भत्त्यांवर 10.20 कोटी रुपये दरवर्षी खर्च होत आहेत. हा खर्च यूपीए सरकारदरम्यान झालेल्या खर्चाच्या 8% जास्त आहे.

सचिवालयातही स्टाफ वाढला
- 2015 मध्ये सचिवालयाच्या स्टाफमध्ये 300 जणांची वाढ करण्यात आली. 1 मार्च 2015 ला येथे 900 कर्मचारी होते, ते आता वाढून 2016 मध्ये 1201 झाले आहेत.
- विशेष म्हणजे, 2008-09 मध्ये आलेल्या जागतिक मंदीनंतर सरकारी खर्चात कपात करण्याचा निर्णय झाला होता, मात्र तसे होताना दिसत नाही.
- अर्थमंत्रालय दरवर्षी नॉन-प्लॅन खर्चावर 10 टक्के कपातीची योजना तयार करत असते.
- या योजनेनुसार, अधिकाऱ्यांचा प्रथम श्रेणी प्रवास करणे, मंत्र्यांसोबत विदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळातील सदस्यांची संख्या कमी करणे अशा उपाययोजना असतात. पंचतारांकित हॉटेलमध्ये परिषदा घेण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे, मात्र याचा कोणताही फायदा झालेला नाही.
पुढील स्लाइडमध्ये, मोदी याआधी केव्हा गेले होते अमेरिकेला