आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदींचा परदेश दौरा, सीआयसीने फाइल मागितली, PMOने दिला होता नकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याशी संबंधित फाइल पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) मागवली आहे. पीएमओने सुरक्षेचे कारण देत आरटीआयअंतर्गत माहिती देण्यास नकार दिला होता.

निवृत्त कोमोडोर लोकेश बत्रा यांनी नरेंद्र मोदी आणि त्याआधीच्या पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर झालेल्या खर्चाचे विवरण मागितले होते. परराष्ट्र मंत्रालयाने आरटीआय अधिनियमाच्या विविध तरतुदींचा हवाला देऊन माहिती नाकारली होती. मुख्य माहिती आयुक्त राधाकृष्ण माथूर यांनी पीएमओला या मागणीबाबत लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत.
पीएमओने पंतप्रधानांच्या कोणत्याही दौऱ्यासंबंधीची माहिती उघड करता येत नसल्याचे स्पष्ट करून सुरक्षाविषयक कारणांचा हवाला दिला होता. या पार्श्वभूमीवर फाइल पाहिल्याशिवाय मागितलेली माहिती सुरक्षेशी संबंधित आहे की नाही हे ठरवता येत नाही. त्यामुळे पीएमओने एक प्रातिनिधिक फाइल सादर करावी, असे निर्देश माथूर यांनी दिले.
बातम्या आणखी आहेत...