आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Asks Shiv Sena Not To Drag Her Mother In Political Issues

पाकिस्तानप्रश्नी आईच्या उल्लेखामुळे मोदी शिवसेनेवर नाराज, उद्धवना पाठविला संदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो- मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील एका भेटीदरम्यानचे छायाचित्र)
नवी दिल्ली- पाकिस्तानसोबतच्या धोरणावरून एनडीए सरकारवर सहयोगी पक्ष शिवसेनेने केलेल्या टीकेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यथित आहेत. याचमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोदी यांनी आपल्या दूतामार्फत एक संदेश देऊन राजकारणाच्या वादात आपल्या आईला ओढू नये असे म्हटले आहे. पाकिस्तानसोबत मोदी सरकारने सकारात्मक चर्चा सुरु केल्याने शिवसेनेने शॉल-साडी डिप्लोमसीवरून दोन दिवसापूर्वी टीका केली होती.

मोदींनी लिहले उद्धवला पत्र- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदींनी आपल्या दूतामार्फत उद्धव ठाकरे यांना एक संदेश पोहचवला आहे. राजकारणाशी संबंधित मुद्यांवरून आपल्या आईला मिळालेल्या भेटवस्तूवर भाष्य करणे हे वैयक्तिक हल्ला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विरोधी पक्षांनीही अशी टिका-टिप्पणी केली नाही त्यामुळे सहकारी पक्षाकडूनही तशी अपेक्षा नाही. दरम्यान, शिवसेनेकडून याबाबत मोदींना कोणतेही उत्तर दिले गेले नाही.

काय आहे प्रकरण?
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान शपथग्रहण समारंभात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना आमंत्रित केले होते. त्यावेळी मोदींनी शरीफ यांच्या आईला शॉल भेटवस्तू पाठवून दिली होती. त्यानंतर शरीफ यांनीही पाकिस्तानात गेल्यावर मोदींच्या आईला एक साडी पाठवली होती. मागील चार-पाच दिवसापूर्वी पाकिस्तानने भारतीय सीमेवर फायरिंग केली होती. त्यात दोन भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी शॉल-साडी डिप्लोमसीने काहीही होणार नाही असे म्हटले होते. पाकिस्‍तानशी चर्चा बंद करून त्यांना धडा शिकवावा व प्रत्येक बाबीचे कडक प्रत्त्युतर द्यावे असेही म्हटले होते. याचबरोबर शिवसेनेचे मुखपत्र सामना अग्रलेख लिहून भाजप व मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता.
पुढे पाहा, मोदी आणि शरीफ यांच्याद्वारे एकमेंकांच्या आईला दिलेल्या भेटवस्तूंची छायाचित्रे...