आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुस्लीम नेत्यांना मोदींनी सर्व्ह केला चहा, अर्ध्या रात्री मदतीचे दिले आश्वासन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुस्लीम नेत्यांची भेट घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. - Divya Marathi
मुस्लीम नेत्यांची भेट घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री मुस्लीम नेत्यांच्या एका शिष्टमंडळाची भेट घेतली. या भेटीदरम्यान मोदी मुस्लीम नेत्यांना म्हणाले की, ‘जर रात्री 12 वाजताही तुम्हाला माझी गरज पडली तर मी तुमच्यासाठी उपलब्ध असेल. यावेळी मोदींनी स्वतः या नेत्यांना चहा सर्व्ह केला.

फुटीरतावादी राजकारणावर विश्वास नाही
या भेटीदरम्यान मोदी म्हणाले की, बहुसंख्याक आणि अल्पसंख्याकांच्या राजकाराणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. अल्पसंख्याकांच्या समस्यांचा तोडगा केवळ रोजगार आणि विकास हाच असू शकतो. मोदींनी मुस्लीम समाजाच्या सुमारे 30 नेत्यांची भेट घेतली. यादरम्यान मोदी म्हणाले की, लोकांमध्ये धार्मिक आधारावर फूट पाडून राज्य करण्यावर माझा विश्वास नाही. तसेच कधीही धार्मिक भाषेचा वापर करत नसल्याचेही ते म्हणाले. ते म्हणाले की, अशा प्रकारच्या राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान जाले ाहे. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे मुख्य इमाम उमर अहमद इल्यासी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाबरोबर झालेल्या सुमारे 45 मिनिटांच्या बैठकीत मोदींनी मुस्लीम समाजाशी संबंधित विविध सामाजिक आणि शैक्षणिक मुद्यावर विस्ताराने चर्चा केली.

काय म्हणाले इल्यासी ?
मोदींबरोबर भेटीनंतर अहमद इल्यासी म्हणाले की, पंतप्रधान रेडीओवर मन की बात करतात पण आम्हालाही त्यांच्याशी आमच्या दिल की बात करायची होती. आम्ही त्यांच्याशी मेक इन इंडियाबाबतही चर्चा केली. काही लोक भारताला उध्वस्त करण्याच्या गोष्टी करतात मात्र पंतप्रधानांनी आम्हाला आश्वासन दिले की, रात्री 12 वाजताही जर तुम्हाला माझी गरज भासली तर मी तुमच्यासाठी त्याठिकाणी उपस्थित राहील. प्रत्येक भारतीयाचा जबाबदारी घेत असल्याचेही मोदींनी त्यांना आश्वासन दिले. यावेळी अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचीही उपस्थिती होती.

सर्वांना भेटले पंतप्रधान
मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे नातू फिरोज बख्त यांचाही या शिष्टमंडळात समावेश होता. मोदींना भेटून आनंदी असलेले बख्त म्हणाले की, पंतप्रधान बसून बोलले आणि सगळे ऐकत राहिले अशी ही बैठक नव्हती. उलट पंतप्रधान प्रत्येकाशी स्वतंत्रपणे बोलले याचा आनंद असल्याचे ते म्हणाले. कोणालाही हिंदु-मुस्लीम कार्ड खेळू देणार नसून केवळ भारतीय कार्ड चालेल असेही त्यांनी सांगितले.

काय म्हणाले पीएमओ ?
मोदी आणि मुस्लीम नेत्यांच्या मुलाखतीनंतर पीएमओकडून एक वक्तव्य प्रसिद्ध करण्यात आले. त्यात असे स्पष्ट करण्यात आले की, पंतप्रधानांनी मुस्लीम नेत्यांना सांगितले की, जर धार्मिक तणाव कमी करायचा असेल तर त्याचा एकमेव उपाय शिक्षण हा आहे. नेत्यांच्या या शिष्टमंडळाने मोदींना मुस्लीम तरुणांसाठी चालवण्यात आलेल्या अनेक योजनांसाठी आभार मानले. मुस्लीम तरुणंच्या एका हातात कुरआन आणि दुसऱ्या हातात कॉम्प्युटर असायला पाहिजे असे मोदी म्हणाले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या शिष्टमंडळाच्या भेटीचे PHOTO