आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोटोकॉल तोडून आईच्या भेटीला गेले होते PM, या घरात राहातात मोदींच्या मातोश्री हिराबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील वर्षी आईच्या भेटीला आले होते मोदी. - Divya Marathi
मागील वर्षी आईच्या भेटीला आले होते मोदी.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा 67वा वाढदिवस साजरा करत आहेत. मोदी आणि त्यांच्या मातोश्री हिराबा यांच्यांतील जिव्हाळा अनेक वर्षांपासून सर्वश्रूत आहे. मोदी वाढदिवसाच्या निमित्ताने आईचा आशीर्वाद घेण्यास नक्की जात असतात. गेल्यावर्षी (2016) मोदी वाढदिवसाच्या दिवशी गुजरात, त्यातही गांधीनगरमध्येच होते. यावेळी मोदींनी सर्व प्रोटोकॉल तोडून स्वतः गाडी चालवत भावाचे घर गाठले आणि आईची भेट घेतली होती. 
 
- नरेंद्र मोदींचा जन्म गांधीनगरमधील रायसन भागात 1950 मध्ये झाला होता. याच भागात मोदी यांचे बंधू पंकज मोदी यांनी बंगला बांधला आहे. हिराबा या पंकज यांच्यासोबतच राहातात. गेल्यावर्षी मोदींनी आईची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला होता. मायलेकाची ही भेट साधारण 25 मिनिटे चालली होती. त्यानंतर त्यांनी दोन कार्यक्रमांना हजेरी लावली होती. 
 - आज मोदींवर देश-विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींपासून राजकीय नेते, उद्योग जगतातील लोक, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील मंडळी त्यांना शुभेच्छा देत आहे. 
 
प्रोटोकॉल तोडून आईच्या भेटीसाठी
- आईच्या भेटीसाठी जात असताना मोदींनी पंतप्रधानांसाठीचा असलेला ताफा सोबत नेला नाही. मोदींना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची सुरक्षा असते. 
- त्यांच्या ताफ्यात साधारणपणे 20 पेक्षा जास्त गाड्या असतात, त्यात सुरक्षा रक्षकांसह पर्सनल स्टाफ, आणि अॅम्ब्युलन्स यांचा समावेश असतो. 
- वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, मोदी त्यांच्या ताफ्याशिवाय आईच्या भेटीसाठी एका एसयूव्ही कारमधून गेले होते. 
- मोदी ज्या मार्गावरुन जाणार होते, त्या मार्गावर नाकेबंदी करण्यात आली होती.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसे आहे माय-लेकातील नाते...
बातम्या आणखी आहेत...