आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी अधिवेशनापूर्वी मोदींनी बोलावली रालोआ आघाडीची बैठक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होणार आहे. ललित मोदी वाद, व्यापमं घोटाळा व इतर मुद्द्यांवर विरोधकांकडून गदारोळ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या पूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील घटक पक्षांची बैठक बोलावली आहे. ही बैठक रविवारी किंवा सोमवारी होण्याची शक्यता आहे.

२०१४ मध्ये रालोआचे सरकार सत्तेवर आल्यापासून अशा स्वरूपाची ही पहिलीच बैठक असेल. पंतप्रधानांनी दोन दिवसांपूर्वीच भाषणात संसद अधिवेशनात विरोधकांसोबत "मुकाबला' होणार असल्याचे म्हटले होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही काही दिवसांपूर्वी बोलताना एनडीएची बैठक बोलावण्याची गरज असल्याचे म्हटले होते.

त्यांनी म्हटले होते की, विरोधकांच्या सामूहिक रणनीतीच्या विरोधात सत्ताधारी पक्षांमध्येही एकजूट असण्याची गरज आहे. लोकसभेत बहुमत असल्यामुळे भाजपप्रणीत लोकशाही आघाडी सरकारला तिथे कोणतीही अडचण नाही; परंतु राज्यसभेतील अंकगणित सरकारसाठी अडचणीचे ठरू शकते.
बातम्या आणखी आहेत...