देशाचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौर्यावर आहेत. न्यूयॉर्क एअरपोर्टवर पोहोचलेले मोदींचा डिफरन्ट लूक संपूर्ण जगाला पाहायला मिळाला. मोदींनी डार्क मरुन रंगाचा कोट परिधान केला होता. 'जसा देश तसा भेस' या धर्तीवर मोदी स्वत:मध्ये बदल करून घेतात. अमेरिका दौर्यातही मोदींचा हा गुण पाहायला मिळाला. मोदी राज्यांच्या दौर्यावर असो अथवा विदेशाच्या त्यांचा ड्रेसिंग सेंसवरून नेहमी चर्चा होत असते.
नरेंद्र मोदी यांनी
आपल्या कामाप्रमाणेच आपल्या ड्रेसिंग स्टाइलकडेही विशेष लक्ष देत असतात. 100 दिवसांच्या कार्यकाळात मोदींनी देशातील विविध राज्यांसह काही राष्ट्रांचाही दौरा केला. काश्मीरपासून अरुणाचल प्रदेश तर भूटानपासून नेपाळपर्यंत नरेंद्र मोदींचे वेगवेगळे लुक्स पाहायला मिळाले.
निवडणूक काळात नरेंद्र मोदी यांचा कुर्ता, जॅकेट आणि हातावर घड्याळ, ही स्टाइल खूप चर्चेत होता. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात तर मोदी कुर्ता आणि नेहरू जॅकेटची मागणी अचानक वाढली होती.
देशातील दिग्गज डिझायनर्सनी नरेंद्र मोदींची 'बेस्ट ड्रेस्ड नेता' म्हणून निवडही केली आहे. वेबसाइट्सद्वारा झालेल्या ऑनलाइन व्होटिंगमध्ये मोदी टॉप ठरले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिफरन्ट लुक्स...