आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK सोबतच्या सिंधू करारावर मोदी म्हणाले- रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी सीमा ओलांंडून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करणे तर थेट सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्‍या इतपत चर्चा पुढे सरकली आहे. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकसोबतचा सिंधु पाणी वाटप करार रद्द करण्याच्या दिशेने पाऊल उचलली आहेत. मोदी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यात आढावा बैठक झाली. बैठकीला परराष्ट्र सचिव एस जयशंकर, राष्ट्रीय सल्लागार अजीत डोभाळ आणि पीएमओचे मु्ख्य सचिव नृपेंद्र मिश्र उपस्थित होते. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही.
मिटिंगमध्ये झाली या बाबींवर चर्चा
- पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतामध्ये दररोज रक्तपात करण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर मोदी म्हणाले, की रक्त आणि पाणी सोबत वाहू शकत नाही.
- झेलमसह पाकिस्तानात वाहत जाणाऱ्या नदीच्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर करण्याला भारताने हिरवी झेंडी दिली.
- सिंधू करारात भारताला अनेक कायदेशीर बाबींची मदत होताना दिसून येते. त्याचा पुरेपुर वापर करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
- या नद्यांच्या पाण्यापासून 18 हजार मेगावॅट वीजेची निर्मिती केली जाऊ शकते. त्यामुळे भाराताची वीजेची गरज कमी होईल.
- या करारावर विचार करण्यासाठी इंटर मिनिस्टिरिअल टास्ट फोर्स तयार केली जाणार आहे.
- तुलबुल प्रोजेक्टचा रिव्ह्यू केला जाणार आहे. 2007 मध्ये यावर काम बंद करण्यात आले होते.
पुढील स्लाइडवर वाचा, भारताने ठरवले तर पाकला एका मिनिटांत वठणीवर आणेल भारत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...