आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi First And Foremost No Designated Second In Command In Pms Absence This Time

विदेश दौर्‍यावर असतानाही नरेंद्र मोदींचे कॅबिनेट मंत्र्यांवर बारीक लक्ष, दररोज घेताहेत आढावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडाच्या नऊ दिवसीय दौर्‍यावर आहेत. स्थिर करप्रणाली, पारदर्शक व योग्य धोरण आणि गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण निर्माण करून भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे, परराष्ट्र दौर्‍यावर असतानाही दिल्लीतील सरकारचा कामकाजावर पंतप्रधान मोदी विदेशातून बारीक लक्ष ठेवत असल्याची माहिती मिळाली आहे.

मंत्रालयातील काम कसे सुरु आहे, याविषयी आढावा घेण्यासाठी मोदी मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याशी फोनवरून संपर्कात आहेत. दररोज सकाळी तीन कॅबीनेट मंत्र्यांना फोन करून त्यांना मोदींकडून महत्त्वाचे निर्देश दिले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मंत्रिमंडळात दुसर्‍या क्रमांकावर एकही नेता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळात कोणाकडेही 'ब्रीफिंग'च‍ी जबाबदारी सोपवली नाही. मोदी स्वत: मंत्र्याशी फोनवरून चर्चा करून सरकारचे कामकाज आणि राजकीय घटनाक्रमाचा आढावा घेत आहेत.
पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत अर्थमंत्री, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, कायदा मंत्री, कृषिमंत्री आणि परिवहन मंत्र्यांसोबत मोदींनी विदेश दौर्‍यादरम्यान संपर्क साधला आहे. संबं‍धित मंत्र्यासोबत् मोदींनी मंत्रालयातील कामकाज आणि देशातील राजकीय वातावरणाविषयी चर्चा केली.

पंतप्रधान मायदेशी परतल्यानंतर कॅबिनेटमध्ये होऊ शकतात फेरबदल
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौर्‍यावर आहेत. मोदी मायदेशी परतल्यानंतर केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. या मुद्यावर नरेंद्र मोदींनी भाजपाध्यक्ष अम‍ित शहाशी फोनवरून चर्चा केली. तसेच अर्थमंत्री अरुण जेटली आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत मोदींनी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी ‍दिली.

पुढील स्लाडवर क्लिक करून वाचा, 'मेक इन इंडिया' ही योजना नसून एक आंदोलन...