आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधान मोदींनी इव्हांकाला दिले हे खास गिफ्ट, गुजरातमध्ये होते निर्मिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी आणि इव्हांका ट्रम्प यांनी मंगळवारी आठव्या इंटरनॅशनल ग्लोबल आंत्रप्रेन्योरशिप समिटचे उद्घाटन केले. इव्हांका भारतात आल्यावर पंतप्रधान मोदींनी त्यांना एक खास लाकडी बॉक्स गिफ्ट दिला. यात सुंदर कलाकुसर केलेली आहे.

 

अशी आहे या बॉक्सची खासियत...
- इव्हांका यांना गिफ्ट दिलेल्या बॉक्सवर गुजराती नक्षीकामांची सुंदर कलाकुसर केलेली आहे.
- या कारागिरीला सडेली क्राफ्ट नावानेही ओळखले जाते.
- या क्राफ्टला सुरतच्या आसपासच्या भागात बनवले जाते.
- बारीक कलाकुसरीमुळे याच्या निर्मितीसाठी खूप वेळही लागतो.
- गुजरातमध्ये या कलाकुसरीचा वापर दरवाजे-खिडक्या यांच्या सजावटीसाठी करण्यात येतो.


वडील डोनाल्ड ट्रम्प यांना दिले होते हे गिफ्ट
- पीएम मोदी जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्हाइट हाऊसमध्ये भेटले होते तेव्हा त्यांना एक सुंदर शृंगारित बॉक्स गिफ्ट केला होता. या बॉक्सला पंजाबच्या होशियारपूरमध्ये बनवण्यात आले होते.
- शीशमच्या काळ्या लाकडापासून बनलेल्या 22 इंच लांब आणि 15 इंच रुंद या शृंगार बॉक्सला बनवण्यासाठी 7 महिने लागले होते, कारण यात बारीक कारागिरी करण्यात आली होती.
- लाकडावर झालेल्या इनले वर्कमध्ये अॅक्रॅलिकच्या पांढऱ्या शीटचे काम आहे, जे हस्तिदंताप्रमाणे दिसते.
- हस्तिदंताच्या वापरावर प्रतिबंध असल्याने अॅक्रॅलिक शीटचा वापर करण्यात आला होता.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...