आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Government Gives A Rs 12 Twist To The Rakhi Knot

देशातील पाच कोटी महिलांना BJP देईल 12 रुपयांची विमा योजना गिफ्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी - Divya Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली- भाऊ बहिणीचा सण 'रक्षाबंधन'निमित्त देशातील महिलांसाठी भाजप नवे कॅम्पेन सुरु करणार आहे. भाजपचे सर्व कार्यकर्ते, आमदार, खासदार आपापल्या बहिणींना 'पंतप्रधान विमा सुरक्षा योजना (PMBSY) गिफ्ट स्वरुपात देणार आहेत. देशातील जास्तीत जास्त महिलांकडून राखी बांधून त्यांना गिफ्ट म्हणून 'लाइफ इंश्युरन्स कव्हर' द्यायला हवा, असे भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे.

अम‍ित शहा यांनी सांगितले की, रक्षाबंधन कॅम्पेनच्या माध्यमातून पाच कोटी महिलांना PMBSY गीफ्ट देण्यात येणार आहे. यासाठी पक्षाने तयारी सुरु केली आहे.

काय आहे PMBSY
'पंतप्रधान वीमा सुरक्षा योजना (PMBSY) ही एक अॅक्सिडेंटल डेथ कम डिसेबिलिटी इंश्युरन्स स्कीम आहे. एक वर्ष या योजनचा कालावधी आहे. अपघातात गंभीर जखमी व्यक्तिला 2 लाख रुपयांचा कव्हर मिळेल. या योजनेत प्रतिमहिना एक रुपयाप्रमाणे वर्षाला 12 रुपये प्रीमियम भरावा लागेल. 18 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्ति या योजनेचा लाभ घेऊ शकतात. बॅंक बचत खातेदार एक अर्ज भरून योजनेचा लाभ घेऊ शकतात. प्रीमियमची रक्कम बॅंक खात्यातून परस्पर कपात करण्‍यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधन कॅम्पेन संदर्भात आपला विचार बंगळुरुमध्ये झालेल्या पक्षाच्या झोनल मिटिंगमध्ये मांडला होता. त्या पार्श्वभूमीवर रविवारी (12 जुलै) भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत रक्षाबंधन कॅम्पेनची घोषणा केली. या कॅम्पेनची जबाबदारी डॉ: अनिल जैन यांच्याकडे सोपवली आहे. तसेच केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी, थांवर चंद गहलोत, डॉ हर्षवर्धन आणि जितेंद्र सिंह यांना लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कॅम्पेनच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदार संघातील 11 हजार महिलांना PMBSY गिफ्ट देण्यात येणार आहे.

दुसरीकडे, बिहार आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपचा उद्देश असल्याची टीका विरोधाकांनी केली आहे.