आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Greets Pakistan On Its Independence Day

पंतप्रधानानी पाकिस्तानला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, पाकच्या कुरापती सुरुच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ट्‍विटर'द्वारे पाकिस्तानला स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आज (14 ऑगस्ट) पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे. तरी देखील काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील गुरूदासपूर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकमधील संबंध पुन्हा एकदा कडवट झाले आहेत. तरी देखील पंतप्रधानांनी सौजन्य दाखवत सौहार्दपूर्ण शब्दात पाकिस्तानी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दुसरीकडे, पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानी जवानांनी शुक्रवारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी जवानांनी भारतीय सीमेवर गोळीबार केला.