आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उरी हल्ल्यानंतर PM ची वॉर रुममध्ये मिटिंग, आर्मीने सांगितला अॅक्शन प्लॅन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उरी हल्ल्यानंतर दोन दिवसांनी अर्थात 20 सप्टेंबर रोजी तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत साऊथ ब्लॉकमध्ये तयार करण्यात आलेल्या स्पेशल वॉररुममध्ये अडीच तास मिटिंग केली. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांविरोधात मिलिटरी अॅक्शन प्लॅनवर चर्चा केली होती. दुसरीकडे वृत्त आहे, की उरी सेक्टर लगतच्या पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तीन प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला करुन त्यांच्या छावण्या उद्धवस्त करण्यात आल्या. यात सुमारे 20 दहशतवादी मारले गेले. उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाले होते. तेव्हापासून भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे.
पंतप्रधानांना दाखवले होते वाळूचे बनवलेले मॉडेल
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही बैठक 20 सप्टेंबर रोजी झाली होती.
- एबीपी न्यूजच्या रिपोर्टमध्ये, एका मोठ्या टेबलवर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या छावण्यांचे नकाशे ठेवण्यात आलेले आहेत. पीएमसमोर वाळूचे मॉडेल ठेवलेले आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या छावण्यांचे हे मॉडेल होते.
- तिन्ही दलांच्या प्रमुखांनी हे मॉडेल दाखवत पंतप्रधानांना सांगितले की कोणतेही ऑपरेशन झाले तर या ठिकाण्यांवर कशी कारवाई करता येईल. आणि त्यांना कसे उद्धवस्त केले जाईल ?
- या बैठकीला मोदींसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल, लष्कर प्रमुख दलबीर सुहाग, वायुदल प्रमुख अरुप राहा, आणि नौदल प्रमुख सुनील लांबा होते. तिन्ही दलांच्या प्रमुखांकडून युद्धजन्य परिस्थितीत काय प्लॅन असेल याचीही माहिती विचारण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...