आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Hosted Man Ki Bat Programmer On Radio

\'मन की बात\'मध्ये मोदी म्हणाले- डिझास्टर मॅनेजमेंटवर SAARC देशांनी एकत्र यावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) 14 व्या 'मन की बात' कार्यक्रमात भाग घेतला. क्लायमेट चेंजचा उल्लेख करीत मोदी म्हणाले, की सार्क देशांनी डिझास्टर मॅनेजमेंटच्या प्रश्नावर एकत्र येणे गरजेचे आहे. नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबत याबाबत मी चर्चा केली होती. तमिळनाडूसह देशातील काही भागात अवकाळी पाऊस झाला आहे. त्याने शेतीचे नुकसान झाले असून जनजिवनही विस्कळित झाले आहे.
यावेळी पंजाबचे शेतकरी लखविंदरसिंग यांच्याशी बोलताना मोदी म्हणाले, की तुम्ही सेंद्रीय शेती करता ही कौतुकास्पद बाब आहे. पण शेतीत शिल्लक माल जाळणे चुकीचे आहे. त्याऐवजी शेतीतील शिल्लक माल जमिनीखाली गाडला तर त्याचे खत होऊ शकते.
आणखी काय म्हणाले मोदी
- प्रदुषणावर चिंता व्यक्त केली. म्हणाले- तमिळनाडूत अवकाळी पाऊस झाला.
- तमिळनाडूत आलेल्या नैसर्गिक संकटात जनतेला मदत करण्याचे काम सरकार करीत आहे.
- शेतातील शिल्लक माल जाळू नका. त्याने धरणी मातेची स्कीन जळत आहे.
- लोकांनी अवयव दान करण्याची गरज आहे.
- काश्मिरातील जावेद अहमद याचा उल्लेख केला. त्याला दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. तरी त्याने पराभव पत्करला नाही. अपंग झाला असला तरी तो समाजसेवा करीत आहे.
- सरकारी कार्यालयात गेल्यावर तेथील बाबूंकडून चांगली वागणूक मिळत नाही. पण असे असले तरी काही सरकारी कर्मचारी निश्चितच चांगले काम करीत आहेत.
- संपूर्ण जग क्लायमेट चेंजच्या मुद्दयाने चिंतित आहे. आपण ऊर्जेची बचत केली पाहिजे.
- 14 डिसेंबर रोजी एनर्जी कंजरव्हेशन डे आहे. आपण पौर्णिमेच्या दिवशी स्ट्रीट लाईट बंद केले पाहिजे.
- कानपूरची एक महिला नुरजहा सोल एनर्जीपासून कंदिल चार्ज करते. तिने 500 घरांमध्ये वीज आणली आहे.
- गोरखपूर येथून अभिषेक पांडेय यांनी फोन करुन विचारले, की मुद्रा कर्जाचा लाभ आम्ही कसे उचलू शकतो?
- 66 लाख लोकांना 42 हजार कोटी रुपयांची मदत लहान-मोठ्या व्यवसायांसाठी झाली आहे.
- मुंबईच्या शैलेश भोसले याला बॅंकेकडून 8 लाख रुपयांचे कर्ज मिळाले. त्याने सिवेज साफसफाईचे चांगले काम सुरु केले आहे.
- देशातील बॅंकांनी लहान व्यवसाय करणाऱ्यांना जास्तीत जास्त लोन दिले पाहिले.
मोदी प्रथम लोकांना मागतात सूचना
मन की बात कार्यक्रम सादर करण्यासाठी मोदी आधी वेबसाईट आणि टोल फ्री क्रमांकावर सूचना मागवतात. यापूर्वीचा कार्यक्रम 25 ऑक्टोबर रोजी झाला होता. यावेळी त्यांनी अवयव दान करण्याचे महत्त्व सांगितले होते. या कार्यक्रमाचा पहिला भाग 3 ऑक्टोबर 2014 रोजी टेलिकास्ट करण्यात आला होता.