आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi In Bihar Poster Of Nitish Kumarin Route Of Pm

पाटणा: मोदी-नितीशकुमार एकाच मंचावर, लालू यादवांना कोपरखळ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बिहारमध्ये अनेक योजना आणि प्रकल्पांच उदघाटन केले. यावेळी मोदींचे कट्टर विरोधक आणि राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार देखील मंचावर उपस्थित होते. नितीशकुमारांनी बिहारमधील प्रकल्पांना उशिर झाल्याची तक्रार केली तर मोदींनी वाजपेयींच्या सरकारनंतर रेल्वे मंत्री झालेल्यांनी प्रकल्प रखडवले असे प्रत्युत्तर दिले.
मोदी शनिवारी सकाळी दहा वाजता पाटणा विमानतळावर पोहोचले. मुख्यमंत्री नितीशकुमारांनी त्यांचे स्वागत केले. पाटण्यातील एका महाविद्याल्यात मोदींनी पाच प्रकल्पांचे उदघाटन केले. मोदी म्हणाले, 'बिहारच्या विकासासाठी मी 50 हजार कोटी रुपये देण्याचे कबुल केले होते. पण माझ्या मनात बिहारच्या विकासाच्या ज्या कल्पना आहेत, त्या 50 हजार कोटींमध्ये पूर्ण होणार्‍या नाहीत. त्यासाठी अधिक निधीची गरज आहे. त्याची घोषणा मी आज येथे करणार नाही तर योग्य वेळी करेल. मी जे आश्वासन दिले होते, त्यापेक्षाही मी अधिक चांगले काम करणार आहे.'
लालू यादवांवर निशाणा
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्या भाषणात केंद्राच्या योजनांना उशिर झाल्याचे म्हटले. त्यावरुन पंतप्रधानांनी माजी रेल्वे मंत्री आणि नितीशकुमारांचे सहकारी आरजेडी प्रमुख लालू यादवांवर निशाणा साधला. मोदी म्हणाले, 'अटलबिहारी वाजपेयींच्या काळात जी काम सहा महिन्यात पूर्ण होत होती, त्यासाठी आता 2015 साल उजाडावे लागले आहे. अटल बिहारींच्या काळात जे रेल्वेमंत्री (लालू यादव) झाले त्यांनी प्रकल्प रखडवून ठेवले.'
नितीशकुमारांचा हल्लाबोल
बिहार दौर्‍यावर आलेल्या पंतप्रधानांवर हल्लाबोल करताना नितीशकुमार म्हणाले, 'अखेर 14 महिन्यानंतर पंतप्रधानांना बिहारची आठवण झाली. बिहारच्या जनतेने पंतप्रधानांना लोकसभा निवडणूक जिंकण्यास मदत केली, त्यांना आपेक्षा होती, की ते बिहारसाठी काही करतील. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देतील.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, पाटण्यातील पोस्टर वॉर