आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US मध्ये असा दिसला PM मोदींचा जलवा, पाहा त्यांचे विविध Looks

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पहिल्या फोटोत न्यूयॉर्क एयरपोर्टवर सुटात पोहोचलेले PM मोदी, दुस-या फोटोत अमेरिका दौ-यासाठी नवी दिल्ली एयरपोर्टहून निघताना नरेंद्र मोदी.)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा संपला आहे. मोदींचा हा परराष्ट्र दौरा अत्यंत यशस्वी ठरल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेत मोदींना ‘रॉकस्टार’ सारखे किताब मिळाले. पाच दिवसांच्या या दौ-यात वेगवेगळ्या कार्यक्रमात मोदी वेगवेगळ्या लूकमध्ये दिसून आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा न्यूयॉर्क विमानतळावर उतरले तेव्हा त्यांचा लूक बदललेला होता. भारतातून दौ-यासाठी निघताना त्यांनी पारंपरिक हाफ स्लीव्हज् कुर्ता परिधान केलेला होता. पण अमेरिकेत पोहोचताच तो लूक बदललेला होता. मोदींच्या या दौ-यासाठी ड्रेस डिझायनिंगची जबाबदारी मुंबईचे प्रसिद्ध डिझायनर ट्रॉय कोस्टा यांच्यावर होती. कोस्टा यांनी आतापर्यंत अनेक अभिनेते, मुकेश अंबानी अशा अनेक बड्या हस्तींसाठी काम केलेले आहे.

मोदींच्या पोषाखाबाबत नेहमीच चर्चा होत असते. मग त्यांचा देशांतर्गत दौरा असो किंवा परदेश दौरा असो. मोदी नेहमीच कपड्यांच्या बाबतीत काळजी घेत असतात. त्यामुळेच आतापर्यंत मोदी ज्याठिकाणीही गेले आहेत, त्याठिकाणी त्यांच्या पोषाखाबाबत उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अमेरिका दौ-यातील मोदींचे विविध looks