आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अाज बंद नव्हे, केवळ विराेध, नाेटाबंदीवर विराेधकांची भूमिका; माेदींनी घेतला समाचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुशीनगर/नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात भाजपच्या परिवर्तन यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर हल्ला चढवला. आम्ही भ्रष्टाचार व काळा पैसा बंद करत आहोत आणि हे लोक (विरोधक) भारत बंद करत आहेत, असे माेदी म्हणाले. दरम्यान, केंद्राच्या नाेटबंदीच्या विराेधात तृणमूल, अन्य पक्षांसह काँग्रेसने साेमवारी भारत बंद नव्हे, देशव्यापी अाक्राेश दिन पाळणार असल्याचे स्पष्ट केले.

कोणत्याही नेत्याचे नाव न घेता मोदींनी प्रश्न विचारला की, भारत बंद व्हावा की भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन व्हावे. कॅशलेस अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करत त्यांनी लोकांना ई-वॉलेटचा वापर करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, नोटबंदीच्या निर्णयाविरुद्ध एकजूट विरोधक सोमवारी आक्रोश दिन पाळणार आहेत. भारत बंद राहणार नाही, आम्ही नोटबंदीचा विरोध करतो, असे काँग्रेसचे जयराम रमेश यांनी स्पष्ट केले आहे.

कॅशलेस सोसायटीकडे चला
‘मन की बात’मध्ये मोदींनी कॅशलेस सोसायटीचे आवाहन करत तरुणांनी रोज १० कुटुंबांना ई-बँकिंग शिकवावे, अशी सूचना केली. नोटबंदीमुळे लहान व्यापारी, शेतकरी, मजूर व सामान्य नागरिकांना अडचणी येत आहेत. मात्र, हा काळ डिजिटल व्यवहाराच्या जगात प्रवेश करण्याची चांगली संधी असल्याचे ते म्हणाले. तसेच प्रवाशांना माेफत जेवू घालणाऱ्या अकाेल्याच्या हाॅटेलचालकाचेही माेदींनी काैतुक केले.
बातम्या आणखी आहेत...