Home | National | Delhi | PM Narendra Modi inaugurates Dr Ambedkar International Centre in Delhi

बाबासाहेबांच्या नावाचे राजकारण करणाऱ्यांना आता भोलेबाबा आठवत आहेत, मोदींचा हल्लाबोल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2017, 01:12 PM IST

नरेंद्र मोदींनी गुरुवारी डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचे इनॉगरेशन केले.

 • PM Narendra Modi inaugurates Dr Ambedkar International Centre in Delhi

  नवी दिल्ली - नरेंद्र मोदींनी गुरुवारी डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचे इनॉगरेशन केले. मोदी म्हणाले की, आपण हे मान्य करायला हवे की, बाबासाहेबांचे स्वप्न आपण पूर्ण करू शकलेलो नाही. आजच्या पिढीमध्ये जी क्षमता आहे ती समाजातील अनिष्ठ बाबी संपवू शकते. हा देश जाती नावावर विभाजन केल्यास पाहिजे तेवढ्या वेगाने विकास करू शकणार नाही. यावेळी राहुल गांधींच्या मंदिर भेटींवरही मोदींनी हल्ला केला. राहुल गांधींचे नाव न घेता मोदी म्हणाले, राजकीय पक्ष बाबासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करतात. पण त्यांना आता बाबासाहेबांपेक्षा बाबा भोले अधिक आठवत आहेत. गुजरात विधनसभा निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधींनी लहान-मोठ्या सुमारे 24 मंदिरांत दर्शन घेतले आहे. आपण शिवभक्त असल्याचेही राहुल म्हणाले होते.

  नरेंद्र मोदींच्या भाषणातील 5 महत्त्वाच्या बाबी
  1) बाबासाहेबांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी काम करतोय

  - नरेंद्र मोदी म्हणाले, 1950 मध्ये बाबासाहेब म्हणाले होते की, आपण केवळ राजकीय लोकशाहीने समाधानी व्हायला नको. जेव्हा सामाजिक लोकशाही निर्माण होईल, तेव्हाच राजकीय लोकशाही यशस्वी होईल. स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षांनंतरही समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या जीवनात आर्थिक साम्य आलेले नाही. पिण्याचे पाणी, छोटेसे घर, विमा आजही हीच सर्व आव्हाने आ वासून आहेत.
  - सरकारच्या योजना बाबासाहेबांच्या योजना सत्यात उतरवणाऱ्या आहेत. जनधनमुळे गरीबांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. 30 कोटींहून अधिक लोकांची खाती उघडली गेली आहेत. 23 कोटींहून अधिक लोकांना रुपे कार्ड देण्यात आले आहे. आता गरीबही रुपे कार्डाद्वारे पैसे काढू शकतात. आता गरीबांनाही पैसे काढणाऱ्यांच्या रांगेत उभे राहायला आवडत नाहीत.

  2) 4 कोटी मोफत वीज कनेक्शन
  - मोदी म्हणाले, स्वच्छता अभियानांतर्गत देशातील बहुतांश गावांत शौचालये तयार आहेत आहेत. महिन्याला एका रुपयाच्या मोबदल्यात अपघात विमा काढला जात आहे. गुर्गम भागातील गरीबाच्या चिंताही कमी होत आहेत.
  - बाबासाहेबांनी कायद्याची समता, संधीची समता गरजेची असल्याचे म्हटले होते. सरकारने पंतप्रधान सौभाग्य योजना सुरू केली आहे. देशातील 4 कोटी घरांमध्ये मोफत वीज कनेक्शन देणार आहोत. 21 वल्या शतकातही 18 व्या शतकाचे जीवन जगणाऱ्यांना नवी उभारी आम्ही देणार आहोत.


  3) प्रत्येकाला घर देण्याचे ध्येय
  नरेंद्र मोदी म्ङणाले, आजही देशातील कोट्यवधी लोकांकडे स्वतःचे घर नाही. 2022 पर्यंत प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर असावे हे सरकारचे लक्ष्य आहे. सरकार लोकांना मदत करत आहे. सूट देत आहे. त्यामुळे कोणी घरापासून वंचिर राहणार नाही, आणि समतेची भावना प्रस्थापित होऊ शकेल.


  4) आम्ही केवळ आश्वासन देत नाही, ते पाळतोही
  - पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आम्ही केवळ योजना तयार करत नाही, त्या वेळेत पूर्णही करतो. 2015 मध्ये लाल किल्ल्यावरून मी घोषणा केली होती की, 18 हजार गांवे वीजेने जोडणार. आम्ही हे लक्ष्य पूर्ण करण्याच्या जवळ पोहोचलो आहोत. शेतकऱ्यांना सॉइल हेल्थ कार्ड देण्याची योजना सुरू केली होती. 10 कोटी शेतकऱ्यांना कार्ड देण्यात आले आहेत. 14 कोटी कार्ड वाटपाचे लक्ष्य आहे. तेही फार दूर नाही. पुढील वर्षी 50 हून अधिक योजना पूर्ण होतील.
  - सरकारने आथापर्यंत 3 कोटींहून अधिक गरीब महिलांना गॅस कनेक्शन दिले आहे. ही आमची कामाची पद्धत आहे.


  5) 3 वर्षांतच 81% गांवे रस्त्यांशी जोडली..
  मोदी म्हणाले, इंद्रधनुष्य अभियानांतर्गत आतापर्यंत 70 लाख गर्भवती महिलांना लस देण्यात आली आहे. सरकारने गावे रस्त्यांशी जोडण्याचे लक्ष्य 2022 पर्यंत ठेवले होते. पण कामाने वेग घेतला आहे, आता आम्ही हे लक्ष्य 2019 पर्यंत पूर्ण करण्याच्या विचारात आहोत. कर दिया है।''
  - 3 वर्षांत 81% गावे रस्त्यांच्या माध्यमातून जोडली आहेत. आता सरकार दलित बांधवांना स्वयंरोजगाराशी जोडण्यावर भर देणार आहे.

  पुढे पाहा, संबधित PHOTOS

 • PM Narendra Modi inaugurates Dr Ambedkar International Centre in Delhi
 • PM Narendra Modi inaugurates Dr Ambedkar International Centre in Delhi
 • PM Narendra Modi inaugurates Dr Ambedkar International Centre in Delhi
 • PM Narendra Modi inaugurates Dr Ambedkar International Centre in Delhi
 • PM Narendra Modi inaugurates Dr Ambedkar International Centre in Delhi

Trending