आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pm Narendra Modi Launces Mudra Bank To Grant Loan For Small Industries

मोदींच्या हस्ते मुद्रा बँकेचे अनावरण, गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना केंद्राचा दिलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (बुधवार) मुद्रा बँकेचे उदघाटन झाले. यावेळी पंतप्रधानांनी गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले. छोट्या व्यापार्‍यांना 10 लाखांपर्यंतचे कर्ज मुद्रा बँकेच्या माध्यमातून दिले जाणार आहे. ही बँक वैधानिक मंडळाप्रमाणे काम करणार आहे. सध्या ही बँक बीज भांडवलाच्या अनुदानासासारखे काम करेल. या बँकेमुळे छोटे व्यापारी, स्वयं सहायता गट, मायक्रो फायनान्स कंपन्या, न्यास यांना स्वस्तात कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
मुद्रा बँकेच्या अनावरण प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले, 'या बँकेच्या स्थापनेचे उद्दिष्ट हे ज्या छोट्या व्यापार्‍यांना व्यापर-उद्योग सुरु करण्यासाठी पैशाची अडचण येते त्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी वित्त पुरवठा करणे आहे.' मोदी म्हणाले, की देशाला बचतीची सवय लावण्याची गरज आहे.
शेतकर्‍यांबद्दल पंतप्रधान म्हणाले, 'गारपीटग्रस्त शेतकर्‍यांची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना दिलेल्या कर्जाची पुर्नरचना करण्याची गरज आहे, याकडे बँकांना लक्ष दिले पाहिजे.' विमा कंपन्यांनाही पुढाकार घेऊन शेतकर्‍यांच्या मागण्यांची पुर्तता करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
बँकिंग सचिव हंसमुख आढिया म्हणाले, मुद्रा बँकेचे विधेयक पुढील सहा महिन्यात संसदेत सादर करण्याची योजना आहे. मुद्रा बँक लघु वित्तपुरवठा संस्था आणि लघु उद्योजकांना पतपुरवठा करेल. त्यांचे नियमन करण्याची जबाबदारी देखील मुद्रा बँकेवरच असणार आहे. देशात 5.75 कोटीहून जास्त लघू उद्योजक आहेत, जे आजही पारंपरिक व्यवसाय करत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये, कोणाला होणार मुद्रा बँकेचा फायदा