आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Launches Digital India Campaign At Delhi

\'डिजिटल इंडिया\'चे उद्धघाटन; अंबानींचे 250 हजार कोटी, 18 लाख रोजगार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना अभिवादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली - Divya Marathi
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना अभिवादन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. सोबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
नवी दिल्ली- चारशे पेक्षा जास्त सीईओ आणि 10 हजार पाहुण्यांच्या उपस्थितीत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना 'डिजिटल इंडिया'चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी यावेळी 'ई-लॉकर' सर्व्हिस सुरु करून 'डिजिटल इंडिया वीक' मासिकाचे प्रकाशनही मोदींच्या हस्ते करण्‍यात आले.

रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानींनी डिजीटल इंडिया मोहिमेत अडीच लाख कोटी रुपयांची गुंतवणुकीची घोषणा केली आहे. तसेच जियोद्वारा देशात करण्यात आलेली गुंतवणूक आणि प्रोजेक्ट्सची माहितीही अंबानी यांनी दिली. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर हा कार्यक्रम झाला.
डिजिटल इंडियाच्या माध्यमातून भविष्यात देशात 18 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. यामुळे गरीब आणि श्रीमंत अशी दरी कमी करण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला देशातील भ्रष्टाचारा‍विरोधात लढा द्यायचा आहे. तसेच देशातील तरुणाईचे डिजिटल इंडियाला मोठे योगदान लाभणार आहे.
देशाला 'मेक इन इंडिया'सोबतच 'डिझाईन इन इंडिया'चीही गरज वाहे. आयातीमध्ये दुसरा सगळ्यात मोठा वाटा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांचा आहे. देशातही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्मिती होते. या उत्पादनाला जागतिक बाजारपेठ मिळवून देणे, हेच डिजिटल इंडियाचे मुख्य ध्येय असल्याचे मोदींनी सांगितले.

डिजिटल लॉकर सर्व्हिसच्या माध्यमातून सगळी सर्टिफिकेट्स, महत्त्वाचे दस्ताऐवज सु‍रक्षित ठेवता येणार आहेत. तसेच सरकारी तसेच निमसरकारी कामे देखील भविष्यात पेपरलेस होणार आहेत.


सध्या देशात 25 ते 30 कोटी लोक इंटरनेट वापरतात पण अजून त्यापेक्षा जास्त लोकांना अद्याप इंटरनेट वापरणे परवडत नाही, ही वस्तुस्थिती असून ती आपल्याला आधी बदलायची आहे. आज लहान मुलगा पण आता स्मार्टफोनशी खेळतो. कारत त्याला त्यात त्याचे भविष्य दिसत आहे. त्याला त्याचे महत्त्व कळाले आहे. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून किमान साडे चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 18 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दार्जिलिंगमधील भूस्खलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत यावेळी जाहीर केली. या कार्यक्रमात सुरुवातीला गावपातळीवर डिजिटल सशक्तीकरणासाठी काम करणार्‍या महिलांना पंतप्रधान मोदींनी लॅपटॉप आणि प्रशस्तीपत्रक देऊन सम्मानित केले. या योजनांबाबत सरकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण लोकांना माहिती देण्यासाठी 600 पेक्षा जास्त जिल्ह्यांत आठवडाभर कार्यक्रम आयोजित केले जातील. या कार्यक्रमाला रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, टाटा ग्रुपचे साइरस मिस्त्री, विप्रोचे अजीम प्रेमजी, एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांच्यासह देशातील अनेक देशातील चारशे उद्योगपती उपस्थित होते. मुकेश अंबानी यांनी डिजिटल इंडिया मोहिमेत 250 हजार कोटी रुपयांची गुंतवणुकीची घोषणा केली. या कार्यक्रमाला कार्यक्रमाला दहा हजार लोक उपस्थित होते.

डिजिटल मोहिमेचे खास वैशिष्ट्‍ये...
> 251 सेवा आणि प्रॉडक्ट लॉन्च करण्यात येतील.
> 600 पेक्षा जास्त शहरात डिजिटल इंडिया कॅम्पेन राबवले जाईल.
> एक लाख कोटी रुपये डिजिटल इंडिया मोहिमेवर खर्च करण्यात येत आहे.
> केंद्र सरकारने एक वर्षापूर्वीच या मोहिमेला मंजुरी दिली होती.
फायदा काय?
>सरकार-जनतेतीलअंतर कमी होईल.
>भ्रष्टाचाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटेल.
>वेळेवर काम होईल.

आव्हाने :
नेटस्पीडमध्ये आपण 52 व्या क्रमांकावर : इंटरनेटवेगवान झाले तर ई-स्वप्न पूर्ण होईल. डाऊनलोड स्पीडमध्ये जगात आपला क्रमांक 52 वा आहे. येथे एमबीपीएस डाऊनलोड स्पीड आहे. गावात 12 ते 20 तास वीज नसते.

> ई-अपॉइंटमेंट-
ऑनलाइन अपॉइंटमेंट मिळेल. संबंधित मंत्रालयाच्या पोर्टलवर जाऊन वेळ घेता येईल. ई-मेलवर माहिती मिळेल.

*फायदा: अधिकाऱ्यांना सतत भेटण्यास नकार देता येणार नाही. किती वेळा भेटीची वेळ मागितली, याचा आपल्याकडे पुरावा असेल.

>डिजिटल लॉकर-
आपली शैक्षणिक कागदपत्रे ठेवता येतील. नोकरी आदीसाठी गरज भासल्यास त्या लॉकरची लिंक देऊन काम भागेल.

*फायदा: फायली सांभाळण्याची कटकट संपुष्टात. वारंवार झेरॉक्स, त्याचे अॅटेस्टेशन, प्रमाणपत्रे हरवण्याची भीती नाही

>ई-बॅग- विद्यार्थी शालेय पुस्तके थेट टॅब्लेट, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर डाऊनलोड करू शकतील. पहिल्या टप्प्यात सीबीएसई दहावी आणि बारावीला लागू होईल योजना.

*फायदा: विद्यार्थ्यांना कुठेही अभ्यास करता येणार. दप्तराचे ओझे कमी होईल.
लँडलाइनवर व्हिडिओ कॉल-ईमेल : लँडलाइनवरूनव्हिडिओ कॉल- कॉन्फरन्सिंग, ईमेल शक्य. घरी-ऑफिसमध्ये जाताच मोबाइल लँडलाइनशी लिंक होईल.

>ई-हॉस्पिटल-
ओपीडीत डॉक्टरांची भेट सोपी. घर वा सायबर कॅफेतून डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळेल. एम्समध्ये चाचणी सुरू.

*फायदा: लांब वरच्या रुग्णांना शहरात येणे, रांग लावण्यापासून मुक्ती.

>ई-हेल्थ-
तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे खेडोपाडी टेलिमेडिसिनद्वारे वैद्यकीय सुविधा. शुल्कही नाममात्र.

*फायदा: रुग्णांना वारंवार शहरात येणे, मोठ्या डॉक्टरांची वेळ मिळणे आदींपासून सुटका होईल.
पुढील स्लाडवर क्लिक करून पाहा, कार्यक्रमाचे फोटो...