आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी क्योटो येथे पोहचले, जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी केले स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भूटान, ब्राजील आणि नेपाळ या देशातील लोकांचे मन जिंकून झाल्यानंतर आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवार) 5 दिवसांच्या जपान दौ-यासाठी क्योटो येथे पोहचले आहेत. येथे त्यांची भेट जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्याशी होणार आहे.
मोदींच्या या दौ-याकडून दोन्ही देशांच्या नागरिकांना खुप आशा आहेत. सर्वात पहिले पंतप्रधान जापानची अध्यात्मिक नगरी म्हणून ओळखली जाणा-या क्योटो शहरात जाणार आहेत.मोदींच्या या दौ-यामुळे दोन देशांमध्ये नवीन इतिहास लिहिला जाईल अशी आशा आहे.

5 दिवसांच्या जपान दौ-यामध्ये मोदी 1 सप्टेंबर रोजी होणा-या द्विपक्षीय बैठकी दरम्यान काही महत्त्वाच्या करारांवर शिक्कामोर्तब करणार आहेत. तसेच बुलेट ट्रेन आणि आण्विक करार या मुद्यावरही चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोदी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या सोबत जपानच्या विख्यात तोजी मंदिरातील एका कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत.