आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Will Likely To Become First PM To Fly Fighter Jet

नरेंद्र मोदी लढाऊ विमानातून उड्डाण करण्याची शक्यता, होतील पहिले पंतप्रधान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो- एमआयजी 29 लढाऊ विमानाच्या कॉकपिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी.)

बंगळूर- लढाऊ विमानात बसून उड्डाण करणाऱ्या पहिल्या भारतीय पंतप्रधानांचा मान नरेंद्र मोदी यांना मिळू शकतो. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालय, संरक्षण मंत्रालय आणि फ्रान्सची जेट फायटर मॅन्युफॅक्टरींग कंपनी डासेल्ट राफेल यांच्यात सकारात्मक चर्चा सुरु आहे. लढाऊ विमान विकत घेण्याबाबत सध्या भारत सरकारची या कंपनीसोबत चर्चा सुरु आहे. ही प्रस्तावित खरेदी सुमारे 82 हजार कोटी रुपयांची आहे.
18 फेब्रुवारीला बंगळूरमध्ये एअरो इंडिया शो आयोजित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी फ्रान्सच्या परराष्ट्रमंत्र्यांसह वरिष्ठ संरक्षण अधिकारी भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी लढाऊ विमान चालवू शकतात. एका आठवड्याच्या आत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
भारतीय वैमानिकांना ट्रेनिंगसाठी योग्य लढाऊ विमान मिळावेत यासाठी या सौदा भारताने लवकर करावा, असे संरक्षण क्षेत्रातील विश्लेषकांचे म्हणणे आहे. राफेलला भारतात निर्माण करण्यात आलेल्या तेजस आणि सुखोई 30 एमकेआयकडून होणाऱ्या तीव्र स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे.
या विमानांची वाढती किंमत आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफरबाबत भारत सरकार विचार करीत आहे. हे दोन मुद्दे वगळता या बनावटीची विमाने विकत घेण्यासाठी केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालय उत्सूक आहेत. यासाठी भारताने अमेरिका, रशिया, स्विडनचे प्रस्ताव रद्दबातल ठरवले होते. या प्रकारच्या विमानांना 2012 मध्येच विकत घेण्यावर एकमत झाले होते. पण अजून हा सौदा अंतिम टप्प्यात पोहोचलेला नाही. या विमानांची किंमत 2012 मध्ये कमी होती. पण आता बरीच वाढली आहे. यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. यासंदर्भात फ्रान्स सरकारसोबत निरंतर चर्चा सुरु आहे.
यापूर्वी यांनी लढाऊ विमानातून केले आहे उड्डाण
बिझनेस टायकून रतन टाटा, बॉलिवूड स्टार शाहिद कपूर यांनी अमेरिकेच्या एफ-16 विमानातून यापूर्वी उड्डाण केले आहे. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि प्रतिभाताई पाटील यांनी सुखोईमधून उड्डाण केले होते. 2003 मध्ये तत्कालिन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनीही सुखोईत उड्डाण केले होते.