(संग्रहित छायाचित्र)
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनी लाला किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यापूर्वी जवानांची भेट घेण्यासाठी लडाखला जाऊ शकतात. तसेच त्यानंतर मोदी सियाचीनलाही जाणार आहेत. दरम्यान मोदींच्या भुतान आणि नुकत्याच झालेल्या नेपाळ दौ-यानंतर भारत-चीन दरम्यान शेजारी राष्ट्रांना आपल्याकडे ओढण्याची स्पर्धा लागली आहे. ऑगस्ट अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला होणा-या मोदींच्या जपान दौ-याच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंगही पुढील महिन्यात पाकिस्तान आणि श्रीलंकेचा दौरा करणार आहेत. ते भारताच्या दौ-यावरही येणार आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसारस मोदींचा सियाचीन दौरा 21 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. लष्करानेही त्याची तयारी सुरू केली आहे. जगातील सर्वात उंचावर असणा-या सियाचीन येथील तळावर जाणा-या मोदींसाठी खास सूटही तयार केला जात आहे. त्यामुळे उणे तापमानातही मोदींना संरक्षण मिळेल. त्यावर मोदींचे नावही लिहिलेले असेल. मोदींच्या या दौ-यांच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांनी त्यांचा उत्तर-पूर्व सीमेचा दौराही रद्द केला आहे. लडाख आणि सियाचीन दौ-यावरही ते मोदींबरोबर असतील.
12 ऑगस्टला लडाख दौरा
जम्मू काश्मीरवर सरकारचे विशेष लक्ष असल्याचा संदेश देण्यासाठीच 12 ऑगस्टला मोदी लडाखला जातील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी लेह आणि कारगिलमध्ये सभाही घेणार आहेत. तसेच ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटनही करणार आहेत. इतरही कार्यक्रम नियोजित आहेत, पण त्याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
असा असेल सियाचीन दौरा
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीएमओ मोदींच्या दौ-याचा अंतिम स्वरूप देण्याच्या तयारीत आहे. प्राथमिक नियोजनानुसार मोदी सियाचीनमध्ये तैनात जवानांबरोबर चर्चा करणार आहेत. आधी मोदी लेहच्या 14 कॉर्प्स कँपला पोहोचतील. तेथून हेलिकॉप्टरच्या मदतीने सियाचीनला जातील. हा दौरा पूर्ण दिवसभराचा असू शकतो. ग्लेशिअरमध्ये (बर्फाच्छदीत प्रदेश) तैनात असणा-या जवानांना किती कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो, याची माहिती मोदी यांनी दिली जाणार आहे.
9 वर्षांनी पंतप्रधानांचा दौरा
यापूर्वी 2005 मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी सियाचीन दौरा केला होता. 9 वर्षांनंतर पुन्हा येथे भेट देणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान असतील.
पुढे वाचा - सियाचीन लेह दौ-यातून काय संदेश देतील मोदी