आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi May Address NRIs In New York\'s Madison Square Garden

न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये अप्रवासी भारतीयांना संबोधित करणार मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन/नवी दिल्ली - पंतप्रधान कार्यालयाने आयोजकांना परवागनी दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यातील आगामी अमेरिका दौ-यात न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डन (MSG) मध्ये अप्रवासी भारतीयांना (NRI) संबोधित करणार आहेत. मॅनहटनमधील या इनडोअर स्टेडियममध्ये कार्यक्रमाला सुमारे 20 हजार अप्रवासी भारतीय उपस्थित असतील. अमेरिकेत प्रथमच भारतीयांच्या एवढ्या मोठ्या सोहळयाचे आयोजन केले जाणार आहे. कार्यक्रमाच्या परवानगीसाठी आयोजकांनी पीएमओकडे प्रस्ताव पाठवला आहे.
अमेरिकेत मोदींचे अनेक प्रशंसक आहेत. त्यामुळेच या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. आयोजकांच्या वतीने भारतीय वंशाचे डॉक्टर भारत बरई यांनी नुकतीच एमएसजी अधिका-यांची भेट घेतली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आयोजनासाठी एमएसजीला भाड्यापोटी सुमारे 60 लाख रुपये दिले जाणार आहेत. एमएसजीने या प्रस्तावाला मंजुरीही दिली आहे. यापूर्वी आयोजक न्यूयॉर्कच्या मेटलाइफ स्टेडियम (क्षमता-82500) किंवा याकी स्टेडियम (क्षमता-50000) मध्ये मोदींची सभा घेऊ इच्छित होते. पण क्रीडा स्पर्धांच्या आयोजनामुळे या ठिकाणी कार्यक्रमांना मजुरी मिळू शकली नाही.
मेडिसनमध्ये प्रथम भारतीय कार्यक्रम
46 वर्षांच्या इतिहासात न्यूयॉर्कच्या मेडिसन सक्वेअर गार्डन (MSG) मध्ये अनेकदा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच याठिकाणी काही भव्य म्युझिक कॉन्सर्टचे आयोजनही करण्यात आले आहेत. त्यात बीटल्स, लेडी गागा यांच्या कार्यक्रमांचा समावेश आहे. तसेच याठिकाणी अली आणि फ्रेजिअर अशा दिग्गजांचे बॉक्सिंगचे आणि अगासी-फेडरर यांच्यात टेनिसचे सामनेही रंगलेले आहेत. मात्र आता प्रथमच याठिकाणी अशा प्रकारच्या भारतीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
पुढे वाचा 2003 मध्ये अटलजींनी केले होते संबोधित
फाइल फोटो : 2003 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या अमेरिका दौ-यातील फोटो, सोबत तत्कालीन राष्ट्रपती जॉर्ज बुश आहेत.
मोदींच्या आधी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंह हेही अमेरिकेच्या दौ-यावर गेले होते. पण त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केले जात होते. त्यात जास्तीत जास्त 1000 अप्रवासी भारतीय सहभागी व्हायचे. 2003 मध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा कार्यक्रम अटलजींसाठी जॅकब जॅविट्स कनव्हेंशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यात त्यांनी सुमारे 3000 अप्रवासी भारतीयांना संबोधित केले होते.