आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi News In Marathi, Congress Leader Mallikajun Kharge

दर्शन द्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी देव आहेत का ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर्शन द्यायला का देव झाले, असा सवाल काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी करताच बुधवारी लोकसभेत हशा पिकला. खरगे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना उद्देशून बोलत होते.

पंतप्रधानांच्या गैरहजेरीचा मुद्दा मल्लिाकार्जुन खरगे यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. मंगळवारी त्यांनी तक्रारीच्या सुरात हा विषय मांडला होता. त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून मोदींनी किमान आठवड्यातून एक दिवस तरी संसदेत हजेरी लावली पाहिजे, असे खरगे यांचे म्हणणे होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सभागृहात स्वराज यांनी भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. खरगे यांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीवरून तक्रार केली होती. परंतु पंतप्रधान प्रश्नोत्तराच्या तासांत सभागृहात होते. तुम्हाला त्यांचे दर्शन झालेही होते, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर खरगे लगेच उत्तरले, अहो दर्शन द्यायला पंतप्रधान काय देव झालेत. खरे तर त्यांनी आठवड्यातून एकदा तरी सभागृहात असावे. एवढेच मला म्हणायचे होते. ते दररोज असावेत, असे मला वाटत नाही. वास्तविक अर्थसंकल्पीय सत्रानंतर मोदी सभागृहात हजर नव्हते, असे खरगे म्हणाले.
निवेदन पीएमनी द्यावे
नवीन सरकारने नवा प्रघात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पंतप्रधानांनी केलेल्या दौर्‍यासंबंधी सभागृहात निवेदन सादर करण्यात येणार आहे, असे सांगून स्वराज यांनी मोदी यांच्या ब्रिक्स परिषदेतील भूमिकेवर निवेदन केले. त्यावर खरगे यांनी भाष्य करताना परिषदेला स्वराज गेल्या नव्हत्या. त्यामुळे निवेदन पंतप्रधानांनीच करणे अपेक्षित होते, अशी कोपरखळी मारली.