आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi News In Marathi, Women Security

देशभरातून मोदींना राख्या पाठवणार; भाजपचा महिला सुरक्षा सप्ताह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना राज्यभरातून सर्वधर्मीय महिला राख्या पाठवत असत. आता देशभरातील महिला त्यांना आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना राख्या पाठवणार असून त्यांना ‘अच्छे दिन’साठी शुभेच्छा दिल्या जाणार आहेत.अशी माहिती औरंगाबादच्या माजी महापौर आणि भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सरचिटणीस विजया किशोर रहाटकर यांनी दिली.

भाजपच्या महिला मोर्चाने या वर्षी राख्या पाठवण्याचा उपक्रम हाती घेतला असून त्यासाठी देशभरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये महिला सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानाला 10 ऑगस्टपासून सुरुवात करण्यात येणार असल्याचे रहाटकर यांनी सांगितले. महिला मोर्चा हे अभियान औरंगाबादेतून राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधानसभेत भाजप महिलांचा सन्मान करेल. जवळपास 20 टक्के महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतील. भाजपच्या अधिक महिलांना उमेदवारी मिळावी यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. रहाटकर या स्वत: औरंगाबाद येथे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांनी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे.