आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी पद्म पुरस्कार कसे मिळायचे सर्वांनाच माहिती असेल, आम्हीच केले ऑनलाईन - पीएम मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी पार पडलेल्या निती आयोगाच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. - Divya Marathi
गुरुवारी पार पडलेल्या निती आयोगाच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्म पुरस्कारावरून यूपीए सरकारवर ताशेरे ओढले आहेत. येथे गुरुवारी पार पडलेल्या निती आयोगाच्या कार्यक्रमात मोदींनी आपल्याच सरकारने पद्म पुरस्कार ऑनलाईन करून प्रक्रिया पारदर्शक केली असा दावा केला. यापूर्वीच्या सरकारांनी पद्म कसे दिले हे सर्वांना माहिती असेल अशा शब्दांत त्यांनी आपण केलेला बदल खूप मोठा असल्याचे मोदींनी सांगितले आहे.
 
 
- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मोदींनी पद्म पुरस्कारांवरून प्रथमच उघडपणे वक्तव्य केले आहे. यापूर्वीच्या सरकारांनी पद्म पुरस्कार मंत्र्यांच्या शिफारशींवर दिले होते. मात्र, आम्ही ही प्रक्रिया ऑनलाईन करून समस्या दूर केली. आता या पुरस्कारांसाठी कुणीही ऑनलाईन उमेदवारी दाखल करू शकतो. 
- मोदींनी यावेळी भ्रष्टाचाराचा देखील उल्लेख केला. संस्थात्मक पद्धतीने सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला रोखता येणार नाही. ते थांबवण्यासाठी संस्थात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. 
- यासोबतच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक नागरिकाने आपला वाटा देणे आवश्यक आहे, असेही पीएम मोदींनी स्पष्ट केले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...