आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Not Invited For Nehar International Conference At Delhi

कॉंग्रेसने दिल्लीत आयोजित केले नेहरु आंतरराष्ट्रीय संमेलन, पंतप्रधानांना नाही निमंत्रण!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आयोजित 'रन फॉर यूनिटी'मध्ये सहभागी झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी )

नवी दिल्ली- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कॉंग्रेसने दोन दिवसीय 'नेहरु आंतरराष्‍ट्रीय संमेलन' आयोजित केले आहे. 17 नोव्हेंबरला नेहरु संमेलनचे उद्‍घाटन होणार असून 18 नोव्हेंबरला समारोप होणार आहे. अनेक देशांच्या प्रमुख नेत्यांना या संमेलनात निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कॉंग्रेसने निमंत्रित केले नसल्याची माहिती मिळाली आहे.

यापूर्वी दिल्लीतील जामा मशितीने इमाम सैयद अहमद बुखारी यांनी मुलगा सैयद शाबान यांना नायब शाही इमाम म्हणून घोषित केले होते. या कार्यक्रमाचेही (दस्तारबंदी) निमंत्रण पंतप्रधान मोदी यांना देण्यात आले नव्हते. बुखारी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निमंत्रित केले होते.
दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये 17 आणि 18 नोव्हेंबरला दोन दिवसीय संमेलन होईल. यात 19 देशांचे 52 नेते सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाला एकूण 54 विदेशी पाहुण्याचे आगमन होईल. यात अनेक देशाचे 12 प्रमुख राजकीय पक्षाचे प्रमुखांची विशेष उपस्थिती असेल. मात्र, या संमेलनाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले नसल्याचेही कॉंग्रेसचे प्रवक्ता आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.

देशात होणार्‍या मोठ्या संमेलनाचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का देण्यात आले नाही? या प्रश्नाला उत्तर देताना आनंद शर्मा म्हणाले, "आम्ही जे काही केले आहे ते योग्यच आहे. नेहरु संमेलन हा कार्यक्रम कॉंग्रेसचा असून त्याचा सरकारशी कोणताही संबंध नाही. देशाचे पंतप्रधान पर्यटक असून ते संमेलनाच्या काळात विदेश दौर्‍यावर जाणार आहेत."

जगातील अनेक नेत्यांना ‍कॉंग्रेसने पाठवले निमंत्रण...
कॉंग्रेसने आयोजित केलेल्या नेहरु आंतरराष्ट्रीय संमेलनात जगभरातील अनेक नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

आनंद शर्मा म्हणाले, अफगानिस्तानचे माजी राष्ट्रपती हामिद करजई, घानाचे जान कुफोर, नाइजेरियाचे जनरल आबो सांजो, नेपाळचे माजी पंतप्रधान माधव के नेपाळ, भूटानची महाराणी अशी दोरजी वांगमो वांगचू, दक्षिण आफ्रिकेचे स्वातंत्रसेनानी अहमद कथाडा, फलस्तीनचे ज्येष्ठ पत्रकार नाबिल शाथ, अरब लीगचे आम्रे मूसा, सोशलिस्ट इंटरनेशनलचे अस्मा जहांगीर आणि सुनील खिलनानी हे उपस्थित राहाणार आहेत. तसेच आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना, बांगलादेशचा अवामी लीग, नेपाळी कॉंग्रेस, व्हियतनामचा कम्युनिस्ट पक्ष आणि मलेशिया यूएमएमओ या राजकीय पक्षांचे प्रमुखही उपस्थित राहणार आहे.

इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीला 'शक्तिस्थळावर पोहोचले नव्हते मोदी...
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या 125 व्या जयंतीनिर्मित आयोजित नेहरु आंतरराष्ट्रीय संमेलनास मोदी यांना कॉंग्रेसने निमंत्रित केलेले नाही. गेल्या 31 ऑक्टोबरला इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी होती. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली देण्यासाठी 'शक्तिस्थळी' उपस्थित राहिले नव्हते. या ऐवजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'रन फॉर यूनिटी' या कार्यक्रमास मोदींना उपस्थिती दिली होती.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, बुखारी यांनीही पंतप्रधान मोदींना दिले नव्हते निमंत्रण...