आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi Ordered Mp And Mla Of Bjp To Give Information About Their Bank Account

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदार, खासदारांनो आपल्‍या बँक खात्यांची माहिती द्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपच्या सर्व खासदार व आमदारांना नोटबंदीनंतरच्या आपल्या बँक व्यवहाराची माहिती पक्षाध्यक्ष अमित शहा यांना देण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दिले अाहेत. यात ३१ डिसेंबरपर्यंत केलेल्या व्यवहारांची माहिती देण्यास सांगण्यात अाले.
पैशाची फिरवाफिरवी करता यावी यासाठीच भाजप नेत्यांना निर्णयाची पूर्वकल्पना होती, असा आरोप विरोधी पक्षांनी नोटबंदीनंतर पंतप्रधानांवर केला होता. संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी बैठकीची माहिती देताना सांगितले की, प्राप्तिकर दुरुस्ती विधेयक विधेयक काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणले असल्याचा विरोधकांचा आरोप पंतप्रधानांनी धुडकावला आहे. या योजनेत जमा झालेला पैसा गरिबांच्या कल्याणासाठी खर्च केला जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...