नवी दिल्ली-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) रेडिओवरील 'मन की बात' या कार्यक्रमात सांगितले, की विदेशात किती काळा पैसा आहे याची मला माहिती नाही. याची यापूर्वीच्या सरकारलाही माहिती नव्हती. मोदींनी निवडणूक प्रचारात केलेल्या वक्तव्यांच्या अगदी विरुद्ध ही भूमिका आहे. त्यावेळी मोदी म्हणाले होते, की जर विदेशातील काळापैसा भारतात परत आणला तर प्रत्येक गरीब व्यक्तीच्या खिशात 3 लाख रुपये असतील. एका भाषणात तर मोदी म्हणाले होते, की विदेशातून परत भारतात आणलेला काळापैसा करदात्यांनाही दिला जाईल.
यासंदर्भात नरेंद्र मोदी म्हणाले, की जेवढे मला समजते, जेवढी माझ्याकडे माहिती आहे, मलाही माहिती नाही आणि गेल्या सरकारलाही माहिती नव्हती की विदेशात नेमका किती काळापैसा ठेवण्यात आला आहे. विदेशातील काळापैसा भारतात आणावा ही आमची भूमिका आहे. यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.
नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. यावर कॉंग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले, की पंतप्रधानांनी निवडणूक प्रचारात जनतेला आंधारत ठेवले.
नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी जनतेला आवाहन केले, की काळापैसा विदेशातून भारतात आणण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आमच्यावर विश्वास ठेवा.
पुढील स्लाईडवर बघा, नरेंद्र मोदींनी काळ्यापैशांबाबत 'मन की बात' कार्यक्रमात सादर केलेली भूमिका... नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांचा व्हिडिओ...