नवी दिल्ली - पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी मलेशियाच्या क्वालालंपूरमध्ये 13व्या आसियान-इंडिया समिटमध्ये भाषण केले. ते म्हणाले, 21 वे शतक आशियाचे असेल. भारतावर लोकांचा विश्वास वाढला आहे. IMF आणि वर्ल्ड बँकेने भारतावर विश्वास दाखवला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामादेखिल या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी मोदींनी चीनच्या पंतप्रधानांची भेट घेतली.
मोदींच्या भाषणाचे ठळक मुद्दे....
> भारत करपद्धतीबाबत विश्वसनीयता आणत आहे. मूडीज एजन्सीने भारताची रेटिंग वाढवली आहे.
> एफडीआयमध्ये 40% टक्क्यांची वाढ. पीपीपी मॉडेलचे समर्थन. भारताला मॅन्युफॅक्चरींग हब बनवणार.
> सरकार टॅक्स फ्री इन्फ्रास्ट्रक्चर बाँड आणणार. विमा, संरक्षण आणि रेल्वेमध्ये खुली गुंतवणूक सुरू करणार.
> तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हे आमचे लक्ष्य. मेक इन इंडियाची मोहीम सुरू केली. स्टार्टअप इंडियाची मोहीम सुरू झाली.
> गांवे आणि शहरांमध्ये पाच कोटी घरे बनवण्याचा उद्देश आसियान देशांची पर्यटनात महत्त्वाची भूमिका. विकसनशील देशांमध्ये भारत सर्वात महत्त्वाचा.
> शेतकऱ्यांना हेल्थ कार्ड दिले. दररोज 23 किमी. रस्त्यांचे निर्माण. भारताचे प्रत्येक राज्य जगाशी जोडले गेले आहे.
> रिफॉर्ममधून आम्ही ट्रान्सफॉर्म केले आहे. गुंतवणूक आणि व्यवसायाचे नियम सोपे केले आहेत.
> भारतात गुंतवणूक वाढली आणि जीडीपीमध्येही सुधारणा झाली.
> कार्बन उत्सर्जनाबाबत भारताला सर्वाधिक चिंता.
> भारत-आसियान हे स्वभाविक भागीदार. आसियान देश मिळून मोठे पॉवर हाऊस तयार करू शकतात.
> आयएमएफ आणि वर्ल्ड बँकेने भारतावर विश्वास दाखवला आहे.
> भारतात विकास झाला, महागाई कमी झाली, वित्तीय तूट कमी झाली. आमच्या धोरणांचा फायदा झाला आहे.
> 18 महिन्यांमध्ये अर्थव्यवस्था सुधारली आहे.
> शिखर परिषदेत मोदींचे भाषण सुरू.
> मोदी म्हणाले, 21 शतक भारताचे असेल.
हल्ल्याची शक्यता...
क्वालालंपूर पोलिसांनी समिटदरम्यान आत्मघातली हल्ल्याची शक्यता व्यक्त करत हाय अलर्ट जारी केला. क्वालालंपूरमध्ये मलेशिया आर्मीचे दोन हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. तर अडीच हजार सैनिक सज्ज ठेवण्यात आले आहेत. क्वालालंपूरच्या पोलिस आयुक्तांनी शहरात 10 ते 12 आत्मघातकी हल्लेखोर असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
आज काय होणार ?
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान आसियान-इंडिया समिटमध्ये सहभागी होतील. दुसऱ्या दिवशी ते 10 व्या ईस्ट एशिया समिटमध्ये सहभागी होतील. भारत 10 वर्षांपूर्वी येथे तयार झालेल्या समुहाचा संस्थापक सदस्य आहे. त्याचबरोबर ते मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझ्झाक आणि समिटमध्ये आलेल्या इतर काही नेत्यांशीही चर्चा करतील. चार दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान मलेशियानंतर सिंगापूरलाही जातील. मोदींच्या तीन दिवसांच्या मलेशिया दौऱ्यात दहशतवाद, मानवी तस्करी, सागरी सुरक्षा, दक्षिण चीन सागर वाद आणि व्यावसायिक मुद्द्यांवर चर्चा होईल.
अॅक्ट ईस्टवर जोर
पंतप्रधानांच्या या दौऱ्यामध्ये अॅक्ट इस्टवर जोर असेल. दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मोदींनीही ते मान्य केले होते. ते म्हणाले, मलेशिया त्यांच्या सरकारच्या अॅक्ट ईस्ट धोरणाच्या बाजुने आहे. आम्ही व्यवसायिक आणि आर्थिक संबंध आणि दृढ करू इच्छितो. मी समिटदरम्यान भारतात इनव्हेस्टमेंटच्या संधी आणि आर्थिक सहकार्याबाबत नक्की चर्चा करेल.
भारतीय समुदायाला संबोधित करणार
मलेशिया दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी तोराना गेटच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होतील. या दौऱ्यात मोदी रामकृष्ण आश्रमाचा दौरा आणि स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरणही करतील. त्याचबरोबर पंतप्रधान भारतीय समुदायाच्या नागरिकांना सबोधितही करतील. मलेशियामध्ये 20 लाखापेक्षा अधिक भारतीय वंशाचे लोक राहतात.
सिंगापूरमध्येही भारतीय समुदायाला भेटणार
सिंगापूरमध्ये पंतप्रधान मोदींचा पहिला कार्यक्रम लेक्चर असेल. त्यानंतर ते राष्ट्रपती टोनी टान केंग याम, पंतप्रधान ली सीएन लूंग यांची भेट घेतील. सिंगापूरच्या गुंतवणूकदारांबरोबर भेटीत भारतातील संधींबाबत चर्चा होईल. सिंगापूरमध्येही मोदी भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित करतील.
मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी परवानगी लागणार
सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या स्थानिक नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पण सिंगापूर सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे 24 नोव्हेंबरला मोदींच्या स्वागतासाठी सिंगापूर एक्सपोमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय वंशाच्या नागरिकांना स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा PHOTOS