आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Reachs Japan: A Guide Of His 5 Day Visit

पंतप्रधान मोदींच्या जपान दौ-यात पहिला करार वाराणसीसाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : जपान दौ-यादरम्यान ओसाका येथे पहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या जपान दौ-यासाठी शनिवार ओसाका एअरपोर्टवर पोहोचले. तेथून ते थेट क्योटो येथे गेले. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे स्वतः त्यांच्या स्वागतासाठी क्योटोमध्ये उपस्थित होते. येथे त्यांनी पंतप्रधानांसाठी खास मेजवानी आयोजित केली होती. मोदींच्या या दौ-यामध्ये पहिला करार वाराणसीच्या विकासाबाबात झाला. क्योटोच्या धर्तीवर वाराणसीचा विकास करण्यासंबंधीच्या करारावर भारतीय राजदूत आणि क्योटोच्या महापौरांनी सह्या केल्या.
या दौ-यात मोदी स्वतःच क्योटो या जपानच्या स्मार्टसिटीची पाहणी करून विकास व इतर सोयी सुविधांची माहिती घेणार आहेत. मोदी सरकारने भारतात 100 स्मार्ट सिटी तयार करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या क्योटो भ्रमणाचा याच्याशी संदर्भ जोडला जात आहे.
पीएम मोदींचा अजेंडा
भारतीय उपखंडाबाहेर मोदींचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. या दो-यात दोन्ही देशांमध्ये बुलेट ट्रेनसंबंधी करार होण्याचीही शक्यता आहे. तसेच सुमारे 85 अब्ज डॉलरच्या व्यापार कराराचीही शक्यता आहे. तसेच संरक्षण क्षेत्रात सहकार्य, नागरी अणु करार, सोयीसुविधांचा विकास आणि नैसर्गिक साधनसंपत्ती या विषयांचाही समावेश आहे.