आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवानांच्या वेतनातून पंतप्रधान निधीला रक्कम गेलीच नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लष्कराच्या कोणत्याही जवानाच्या पगारातील रक्कम पंतप्रधान आपत्कालीन मदत निधीमध्ये जमा करण्यात आलेली नाही, असे लष्करी विभागाकडून गुरुवारी स्पष्ट करण्यात आले.
लष्कराच्या कोणत्याही जवानाच्या पगारातील रकमेचा वापर निधीत जमा करण्यासाठी झालेला नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या चिंतेचे कारण नाही. लेफ्टनंट कर्नल राजीव गुलेरिया यांनी यासंबंधीच्या वादानंतर वस्तुस्थिती मांडली. सध्या हे प्रकरण विचाराधीन आहे. माहिती अधिकार कायद्यानुसार डेहराडून येथील प्रभू दांद्रियाल यांनी अर्ज दाखल केला होता. त्यावरील उत्तरात ही माहिती उजेडात आली आहे. ६७ व्या लष्करी दिनाच्या समारंभात पंतप्रधान कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या छायाचित्रात प्रकाशित झाले होते. लष्कराच्या वतीने एक दिवसाचा पगार देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग यांच्या हस्ते १०० कोटी रुपयांचा धनादेश पंतप्रधान मोदी यांना प्रदान करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती.
पीएम कार्यालयात पाठपुरावा
दांद्रियाल यांनी आता पंतप्रधान कार्यालयात या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे. लष्करप्रमुखांनी दिलेल्या धनादेशाची माहिती मिळवण्यासाठी दांद्रियाल पंतप्रधान कार्यालयास विचारणा करणार आहे.
कपात नाही मग पैसे दिले कसे?
मार्च २० पर्यंत लष्करी पगारातून कोणतीही रक्कम कपात झाल्याचे दिसून येत नाही. मग १०० कोटी रुपये पंतप्रधान निधीत जमा कसे करण्यात आले? म्हणूनच मला पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्टीकरण हवे आहे. त्यासाठीच मी नवा अर्ज दाखल करणार आहे.
प्रभू दांद्रियाल, अर्जदार, माहिती अधिकार कायदा