नवी दिल्ली- म्यानमार,ऑस्ट्रेलिया आिण फिजी या तीन देशांचा नऊ दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान
नरेंद्र मोदी गुरुवारी मायदेशी परतले. या दौऱ्यात मोदींनी या तिन्ही देशांत अनेक द्विपक्षीय करार केले. या देशांशी असलेले संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने काही ठोस आश्वासनेही दिली. सकाळी सव्वासातच्या सुमारास ते राजधानीत दाखल झाले.
फिजी ते भारत या १४ तासांच्या प्रवासात मोदी यांचे विशेष विमान म्यानमारमध्ये इंधन भरण्यासाठी दोन तास थांबले होते. सकाळी भारतात दाखल झाल्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर ज्येष्ठ सदस्यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. या दौऱ्यात मोदींनी म्यानमारमध्ये एसियान परिषदेत, तर ऑस्ट्रेलियामध्ये जी-२० शिखर बैठकीत सहभाग घेतला. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात फिजी दौऱ्यात त्यांनी या देशाला साडेसात कोटी डॉलर कर्ज देण्यासंबंधीचा करार केला. ऑस्ट्रेलिया आणि फिजीमध्ये त्यांनी संसदेतही भाषण केले. अमेरिकेतील मॅडिसन स्क्वेअर येथील भाषणानंतर ऑस्ट्रेलियातील भाषणाचीही चर्चा रंगली होती.
१. म्यानमारमध्ये एसियान परिषदेत भारताची भूमिका स्पष्ट करताना धर्म आिण दहशतवाद याची सरमिसळ करू नका, असे आवाहन मोदींनी केले. यामुळे मुस्लिमबहुल राष्ट्रांतील जनता सरकारांनी मोदींच्या भूमिकेचे स्वागत केले. २. ऑस्ट्रेलियातमोदींनी चार शहरांचा दौरा केला. यादरम्यान ऑस्ट्रेलियन पंतप्रधान टोनी अॅबोट यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेमध्ये प्रामुख्याने संरक्षण, सायबर, जलवाहतूक आिण दहशतवाद अशा मुद्द्यांवर एकमत झाले.
३. भारताला आण्विक विद्युत निर्मितीसाठी आवश्यक असलेले युरेनियम ऑस्ट्रेलियाकडून मिळण्याचा मार्गही या दौऱ्यामुळे खुला झाला. यासाठी दोन्ही देशांत नागरी आण्विक करार केला जाईल.
४. भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानबहुप्रतीक्षित मुक्त व्यापार करारही पुढील वर्षी केला जाईल. यामुळे परस्पर देशांमधील उत्पादनांना सहजपणे बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल.