आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीसाठी राज्यांना द्यावी लागणार परीक्षा; मोदींनी लाँच केली योजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्मार्ट सिटीची आशा असलेल्या राज्यांना परीक्षा द्यावी लागेल. १०० मार्कांचा पेपर सोडवावा लागेल. पास झाल्यास निवड, नापास झाल्यास पुन्हा तयारी करून वर्षभरानंतर फेरपरीक्षा द्यावी लागेल.

याच दिशानिर्देशांसह गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी स्मार्ट सिटी आणि अमृत योजना लाँच केली. स्मार्ट सिटीचे प्रबळ दावेदार महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या शहरांना २१ हायटेक सुविधा मिळतील. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार टास्कच्या रूपात १३ प्रश्न विचारले जातील. राज्यांला लेखी उत्तरे द्यावी लागतील. टास्क १०० मार्कांचा असेल. १३ पैकी ७ प्रश्नांसाठी कमाल १० आणि उर्वरितांसाठी ५-५ गुण असतील. अव्वल येणारी शहरे पुढील राऊंडमध्ये जातील.

स्मार्ट पेपर, स्मार्ट प्रश्न
१० गुणांचे प्रश्न :
किती घरांत पक्की शौचालये - कर, भाड्यातून किती महसूल - जलयंत्रणांवर होणारा खर्च - जेएनयूआरएममध्ये साध्य उद्दिष्टे - २०१२ मध्ये मंजूर प्रकल्पांपैकी किती पूर्ण - ३ वर्षांत करवसुली - अंतर्गत स्रोतांतून महसूलात योगदान.

५ गुणांचे प्रश्न : ऑनलाइन तक्रार निवारण यंत्रणा - ई-न्यूज लेटर - प्रकल्प खर्चाचे विवरण वेबसाइटवर टाकणे - आवश्यक सेवांच्या विलंबावर दंड - स्थानिक स्वराज्य संस्थांतील वेतन देणे - २०१२-१३ चे ऑडिट

स्मार्ट सिटीच्या सुविधा : ट्रॅफिक जॅम, प्रदूषण, स्रोतांचा दुरुपयोग घटवण्यासाठी लहान टाउनशिप.बहुतांश कामांसाठी पायी, सायकलवर जाता येईल. २४ तास वीज-पाणी, बहुपदरी रोड, ड्रेनेज आदी सुविधा.
बातम्या आणखी आहेत...