आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटीसाठी पंतप्रधान मोदी नरमले, सोनिया, मनमोहनसिंग यांच्याशी चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जीएसटीसह अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करून घ्यायची असल्यामुळे मोदी सरकारचे सूर बरेचसे नरम पडले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आपल्या शासकीय निवासस्थानी चहापानासाठी निमंत्रित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतही सर्वसंमतीचा राग आळवला आणि त्यांनी सर्वसंमती घडवण्याच्या दिशेने प्रयत्नही सुरू केले.

मोदींनी पंतप्रधान निवासस्थानी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना चहापानासाठी बोलावले. या वेळी अर्थमंत्री अरुण जेटली आणि संसदीय कार्यमंत्री एम. व्यंकय्या नायडूही हजर होते. तत्पूर्वी लोकसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त संविधानावरील प्रतिबद्धता या विषयावर दोन दिवस चाललेल्या चर्चेला पंतप्रधानांनी उत्तर दिले. मोदी म्हणाले, घटनेत बदल करण्याबाबत विचार केला जात आहे असा भ्रम पसरवला जात आहे. पण कोणीही घटनेत बदल करण्याचा विचार करू शकत नाही आणि कोणी तसा विचार केला तर ती त्याची आत्महत्या ठरेल. असहिष्णुतेबाबत पंतप्रधान म्हणाले, या सरकारचा एकच धर्म आहे तो म्हणजे इंडिया फर्स्ट. सरकारचा एकच धर्मग्रंथ आहे-भारताचे संविधान. देश घटनेनुसार चालत आहे आणि यापुढेही पुढेही चालत राहील.
सरकार का नरमले?
सरकारने हिवाळी अधिवेशनात मंजुरीसाठी ३८ मुद्द्यांची यादी तयार केली आहे. त्यातील २२ मुद्दे महत्त्वाचे आहेत. आर्थिक सुधारणांसाठी जीएसटी विधेयक सर्वात महत्त्वाचे आहे. त्याद्वारे अप्रत्यक्ष करांचे सरळीकरण करायचे आहे. त्याशिवाय रियल इस्टेट, एससी/एसटी (अत्याचार प्रतिबंधक), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, व्हिसल ब्लोअर संरक्षण कायदा, ज्युवेनाइल जस्टिस यासह अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर करून घ्यायची आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, राहुल गांधी, अरुण जेटली , व्यंकय्या नायडू काय म्‍हणाले..