आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षकदिनी पंतप्रधान मोदी यांचा विद्यार्थ्यांसोबत मुक्तसंवाद, वाचा प्रश्नोत्तरे, बघा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(व्हिडिओ सौजन्य - दूरदर्शन)
नवी दिल्ली - शिक्षक दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिल्ली ऑडीटोरियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात देशभरात हजारों विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे देशभरातील सरकारी आणि खासगी अशा सर्व शाळांमध्येही मोदींचे हे भाषण विद्यार्थ्यांना लाइव्ह दाखवण्यात आले. त्यानंतर नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. देशभरातील विविध भागांमधून विद्यार्थी टेलिकॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांना प्रश्न विचारले.
सर्वात शेवटी मोदींनी सर्व बालकांचे आभार मानले. कधीही तुमच्यामधील बालकत्व संपू देऊ नका असे मोदी म्हणाले.

कार्यक्रमातील ठळक मुद्दे...
नरेंद्र मोदींचे कार्यक्रमस्थळी आगमन...
मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणीही मोदींबरोबर उपस्थित...
सर्वप्रथम इराणी यांनी व्यक्त केली मते...
विद्यार्थ्यांशी चर्चेच्या निर्णयासाठी मानले मोदींचे आभार...
विद्यार्थ्यांनी दिली डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाबाबत माहिती
पंतप्रधानांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक
मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे...
- देशाच्या भावी पिढीशी चर्चा करण्याची संधी मिळणे हे सौभाग्य.
- हळू हळू या दिवसाचे महत्त्व कमी होत चालले आहे.
- हुशार विद्यार्थी शिक्षक बनायला उत्सुक नसतात.
- याचे कारण समजून घ्यावे लागणार, चर्चा करावी लागणार, शिक्षकी सेवेचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहचवावे लागणार.
- भारत तरुण देश आहे. त्यामुळे आपण जगात चांगले शिक्षक पाठवण्याचे आव्हान का पेलू नये?
- पूर्वी गावातील सर्वात आदर्श किंवा आदरणीय व्यक्ती शिक्षक असायचा. पण ती स्थिती आता बदलली आहे. पुन्हा तशी स्थिती आपण निर्माण करू शकतो.
- अनेक विद्यार्थी शिक्षकांचे अनुकरण करत असतात. त्यांच्यासारखे कपडे वापरणे, केशरचना करणे सुरू असते. शिक्षक त्यांचे हिरो असतात.
- जपानमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी एकत्रितपणे स्वच्छता करतात, भारतातही आपण तसे करू शकतो.
- देशातील डॉ्क्टर, इंजिनिअर, मोठे अधिकारी यांनी आठवड्यातून वि्द्यार्थ्यांना एक दिवस शिकवावे.
- मोठ्या व्यक्तींची जीवनचरित्रे वाचायला हवी.
- विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञानाशी जोडण्याची गरज.
विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न व मोदींचे उत्तर
प्रश्न - गुजरातहून दिल्लीला आल्याने काय फरक पडला? पंतप्रधान बनल्याने दिनचर्येत काय फरक पडला?
उत्तर - सध्या कामातच व्यस्त आहे. पण तसा काही फरक पडला नाही. मुख्यमंत्री व पंतप्रधानांच्या कामात तसा फारसा फरक नसतो. पण राज्यापेक्षा ही जबाबदारी नक्कीच मोठी आहे. मुख्यमंत्रीपदाचा अनुभव कामी आला.
प्रश्न - जीवनात सर्वाधिक महत्त्व कशाचे अनुभवाचे की शिक्षकांचे?
उत्तर - अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक म्हटले जाते. पण जर चांगले शिक्षण मिळाले नाही तर अनुभव समस्या बनू शकतो. शिक्षण किंवा संस्कार कसे आहेत, यावर अनुभव ठरत असतात. त्यामुळे यांचे सारखेच महत्त्व आहे.
प्रश्न - तुम्ही लहान असताना कधी पंतप्रधान बनण्याचा विचार केला होता का?
उत्तर - मी सामान्य कुटुंबातील असल्याने कधी असा विचार केला नव्हता. अशा महत्त्वकांक्षा कधी कधी ओझे भासू लागतात. त्यामुळे स्वप्ने नक्की पाहा, ती पूर्ण होण्याची अट ठेवू नका, असे मी बालमित्रांना सांगेन.
प्रश्न - आमच्यासारख्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून काय फायदा?
उत्तर - फायदा मिळाला असता तर आलो नसतो. कारण लाभासाठी केलेली कामे संकटात टाकतात. देश आमचे चेहरे पाहून थकला आहे, त्यामुळे तुमचे चेहरे पाहून लोक आता आनंदी होती. मलाही तो आनंद अनुभवायचा होता.
प्रश्न - लोक म्हणतात तुम्ही फार कडक आहात, पण आज आम्हाला तसे वाटत नाही, मग तुम्ही प्रत्यक्ष जीवनात कसे आहात?
उत्तर - मी एक घटना सांगतो. लहान असताना मला बोलण्याचा छंद होता. त्यामुळे मला काही ठिकाणी बोलायला आमंत्रित करायचे. मला अशाच एका कार्यक्रमाला बोलावले. मला बायोजाटा मागण्यात आला. आणखी एक व्यक्ती बोलायला येणार होते. त्यांचाही बायोडाटा मागितला होता. कार्यक्रमात त्यांचा बायोडाटा वाचला तो दहापानी होता. पण त्यांचे भाषण तीन मिनिटांत संपले. मी बायोडाटा संदर्भात उत्तर लिहिले होते की, अद्याप मला कळलेले नाही मी कोण आहे. त्यामुळे त्यांनी तेच त्याठिकाणी सांगितले. त्यामुळे मला अजून कळालेले नाही मी काय किंवा कसा आहे? पण मी जर कडक किंवा शिस्तप्रिय नसतो तर यशस्वी झालो नसतो.

प्रश्न - मी भारताचा पंतप्रधान कसा बनू शकतो?
उत्तर - 2024 च्या निवडणुकांची तयारी करा. म्हणजेच तोवर मला काही धोका नाही. भारत हा लोकशाही देश आहे. संविधानाने आपल्या एवढे मोठे स्वातंत्र्य दिले आहे की, तुम्ही लोकांचे प्रेम मिळवले तर देशातील कोणीही या स्थानापर्यंत पोहचू शकतो. तुम्ही पंतप्रधान बनले तर, मला शपथविधीसाठी नक्की बोलवा.
प्रश्न - जपान आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेच काय फरक आढळला?
उत्तर - मी जपानमध्ये शिक्षणपद्धती समजून घेण्यासाठीट शाळेला भेट दिली. त्याठिकाणी शिकवण्यापेक्षा शिकण्यावर भर दिला जातो. म्हणजेच TEACHING ऐवजी LEARNING. शिस्त खूप कडक आहे. आई वडील शाळेत सोडवायला येणार नाही असा नियम आहे. सर्व पालक सर्व मुलांशी जोडले जातील अशी एक व्यवस्था आहे. तंत्रज्ञानाचा भरपूर वापर होत आहे. बालकेही सहजपणे तंत्रज्ञानाचा वापर करतात. शिस्त, स्वच्छता सगळीकडेच आढळते. सगळ्यांच्या वागणुकीत आदर आढळतो.
प्रश्न - तुम्ही शिक्षक असते तर कसे विद्यार्थी आवडले असते, बुद्धीमान की आळशी?
उत्तर - शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणताही भेदभाव नसावा. त्याने सगळ्यांना समान समजावे. प्रत्येकात काहीतरी वैशिष्ट्य असते. ते ओळखायला हवे व ते वाढवण्याचा प्रयत्न करायला हवे. आई ज्याप्रमाणे आपल्या मुलांमध्ये फरक करत नाही, तसेच शिक्षकाने वागायला हवे.
प्रश्न - विद्यार्थी काळात केलेल्या खोड्या आठवतात का? त्यापैकी आम्हाला काही सांगू शकाल का?
उत्तर - नक्कीच, खोड्या करणार नाही अशी लहान मुले असूच शकत नाहीत. उलट आज बालपण वेळेआधी संपत आहे, याची मला चिंता आहे. बालपण दीर्घकालीन असायला हवे. ते जीवनाच्या विकासासाठी आवश्यक असते. तर मीही खोड्या करायचो. आम्ही काही मित्र खोडकर होतो. लग्नात सनई वाजवतात त्यांना आम्ही चिंच घेऊन जायचो. त्यामुळे त्यांच्या तोंडाला पाणी सुटायचे व ते सनईच वाजवू शकत नसायचे. पण तुम्ही तसे करू नका. आणखी एक सांगतो. एखाद्याचे लग्न असेल तर आम्ही जायचो. त्याठिकाणी उभे असणा-यांच्या कपड्यांना आम्ही स्टॅपलने अडकवायचो आणि पळून जायचो.
प्रश्न - मी दंतेबाड्यातून बोलत आहे. आमच्या जंगली परिसरात उच्च शिक्षणाची खास मुलींसाठी अत्यंत कमी सुविधा आहे. त्यासाठी तुम्ही काय कराल.
उत्तर - मी दंतेवाडामध्ये अनेकदा आलो आहे. त्याठिकाणी आमचे रमणसिंगची अत्यंच चांगले काम करत आहेत. मुलींच्या शिक्षणाला महत्त्व द्यायलाच हवे. कारण मुलगा एकटा शिकतो. पण मुली संपूर्ण कुटुंबाला शिकवत असतात असे म्हटले जाते.
प्रश्न - देशाच्या विकासासाठी आम्ही मुले काय मदत करू शकतो?
उत्तर - चांगले विद्यार्थी बनणे, हीदेखिल देशाची सेवा आहे. स्वच्छतेबाबत जागरूक राहा. देशसेवा म्हणजे केवळ देशासाठी प्राण देणे नाही, वीज वाचवूनही देशाची सेवा करता येते. म्हणजे तुम्ही वीज वाचवली तर तुमची बचत होईल आणि एखाद्याचे घरही उजळेल. त्यामुळे या लहान लहान गोष्टीतून देशसेवा करता येऊ शकते
प्रश्न - पर्यावरण रक्षणासाठी आम्ही काय करू शकतो?
उत्तर - पर्यावरणात बदल झालेला नाही, तर आपल्यामध्ये बदल झाला आहे. त्यामुळेच पर्यावरणात बदल झाला आहे. त्यामुळे आपण बदलण्यास तयार असलो तर पर्यारणही बदलण्यास तयार आहे. त्यामुळे निसर्गावर प्रेम करायला हवे. आपण संपूर्ण ब्रह्मांडाला कुटुंब मानतो. आपण निसर्गाबरोबर जगणे विसरलो आहे. ते आपण शिकायला हवे.
प्रश्न - राजकारण हा अवघड पेशा आहे का? या कामातील दबाव कसा सांभाळावा?
उत्तर - राजकारण हा पेशा नाही, तर सेवा आहे. त्याच भावनेने राजकारण करायला हवे. हा देश माझा आहे, असा विचार केला तर काहीही अवघड जात नाही.
प्रश्न - तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री असताना वाचो गुजरात अभियान राबवले होते, तसा काही विचार राष्ट्रीय पातळीवर आहे का?
उत्तर - अशा अभियानाचा विचार नाही, पण डिजिटल इंडिया या तंत्रज्ञानाशी निगडीत स्वप्न आहे. कारण त्यातून नवनवीन शोध लावण्यास मदत होइल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तंत्रज्ञानाच्या मदतीने देशातील किती शाळांपर्यंत पोहोचता येते याचा अंदाज घेत आहे. वाचनाची सवय तर असायलाच हवी. तुम्ही काहीही वाचा पण वाचणे गरजेचे आहे.
प्रश्न - तुमच्या भाषणात तुम्ही वीज वाचवण्याचा संदेश देता, यासाठी आम्ही काय करावे असे तुम्हाला वाटते?
उत्तर - आपण वर्गातील दिवे सुरू आहेत का? याकडे लक्ष ठेवावे. आपली मोकळ्या हवेत झोपण्याची सवय मोडली आहे. एसीची सवय आपल्याला लागली आहे. कधी असी प्रयोग करावा. वीज वाचेल अशा उपकरणांचा वापर करावा. अशा प्रकारे आपण आपल्या परीने मदत करू शकतो.
प्रश्न - मुलींच्या शिक्षणासंदर्भात पुढील पावले काय असणार?
उत्तर - ग्रामीण भागात पाचवीनंतर विद्यार्थीनींना दुस-या गावी जावे लागते. पालक त्याला तयार नसतात. त्यामुळे गावातच शिक्षणाची व्यवस्था होईल असा प्रयत्व करत आहोत. तसेच शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी काय करता येईल, याबाबत विचार करत आहोत.

पुढील स्लाइड्‍स पाहा, कार्यक्रमाचे फोटो...