आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध बँकांच्या 500 शाखांत मोदींनी करून घेतले स्टिंग, बँकांत झालेल्या प्रत्येक घोटाळ्याची चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नव्या नोटा सामान्य लोकांपर्यंत कमी पोहोचत आहेत, तर दुसरीकडे काळाबाजार करणाऱ्यांच्या तिजोऱ्या भरल्या आहेत. ही गडबड करणारे बँक व्यवस्थापक आता सरकारच्या रडारवर आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, या घोटाळ्याच्या चौकशीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकांच्या ५०० शाखांत स्टिंग केले आहे. त्यात सरकारी आणि खासगी अशा दोन्ही बँकांचा समावेश आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अर्थ मंत्रालयाला ४०० पेक्षा जास्त सीडी मिळाल्या आहेत. त्यातून बँकांत पोलिस-दलाल आणि प्रभावशाली व्यक्ती यांच्या साट्यालोट्यातून जुन्या नोटा कशा बदलल्या जात आहेत, हे स्पष्ट दिसत आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, बँकांत झालेल्या प्रत्येक घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. सध्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून सरकार कारवाई टाळत आहे. चलनाचे संकट थोडे दूर झाल्यानंतर भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई सुरू होईल. बहुधा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये ही कारवाई होऊ शकते. महसूल गुप्तचर सूत्रांनुसार, बँकांची भूमिका योग्य राहिली असती तर लोकांना एवढी अडचण झाली नसती.

भ्रष्टाचारी आणि बेइमान यांची गय करणार नाही : मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई जारी ठेवण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, ‘भ्रष्टाचारी आणि बेइमान यांची गय केली जाणार नाही.’ दाट धुक्यामुळे बहराइचमध्ये त्यांचे हेलिकॉप्टर उतरू शकले नाही. त्यानंतर मोदी यांनी लखनऊच्या अमौसी विमानतळाच्या व्हीव्हीआयपी लाउंजमधून फोनवरूनच जाहीर सभेला संबोधित केले.

जनार्दन रेड्डींचा जवळचा अधिकारी नायक याला अटक
कर्नाटकमधील मंड्या पोलिसांनी विशेष भूसंपादन अधिकारी भीमा नायकला अटक केली आहे. तो खाण व्यावसायिक जी. जनार्दन रेड्डी यांच्या जवळचा आहे. मागील आठवड्यात नायकचा सरकारी चालक केसी रमेश याने आत्महत्या केली होती. त्याने सुसाइड नोटमध्ये नायक याने रेड्डींच्या मुलीच्या लग्नासाठी १०० कोटींच्या नोटा बदलून दिल्या असा उल्लेख केला होता.

डिजिटल पेमेंटसाठी सुरू होणार १४४४४ हेल्पलाइन
डिजिटल पेमेंटसाठी टोल फ्री हेल्पलाइन १४४४४ सुरू होईल. ही सेवा आठवडाभरात सुरू होण्याची शक्यता आहे. सॉफ्टवेअर सेवा कंपन्यांची संघटना नॅसकॉमचे अध्यक्ष आर. चंद्रशेखर यांनी सांगितले की, त्यासाठी कॉल सेंटर बनवण्यात येत आहे. डिजिटल जागरूकतेसाठी शुक्रवारी डिजिशाला हे टीव्ही चॅनल सुरू झाले आहे. ते दूरदर्शनच्या डीटीएच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. कॅशलेसइंडिया ही वेबसाइटही त्याच धर्तीवर सुरू झाली आहे.

घरातून १३.५६ कोटी रुपये जप्त, वकील फरार
दिल्लीच्या ग्रेटर कैलाश भागातील लॉ फर्मच्या छाप्यात १३.५६ कोटी रुपये आणि नोटा मोजण्याची दोन यंत्रे जप्त करण्यात आली. फर्मचा मालक वकील रोहित टंडन फरार झाला आहे. गेल्या महिन्यात प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात टंडनची १२८ कोटींचे बेहिशेबी उत्पन्न पकडण्यात आले होते. त्याच्या बँक खात्यांतही १९ कोटी रुपये मिळाले होते. आतापर्यंत एकूण १६० कोटी रुपये जप्त झाले आहेत.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...